वाशिम : आयकर विभागाने शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. खासदार गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले आहे. त्यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती आयकर विभागाने गोठवली आहे. त्यामुळे भावना गवळी यांना मोठा धक्का बसला आहे.
वाशिम : खासदार भावना गवळी पुन्हा अडचणीत अ़कल्या आहेत. आयकर विभागाने त्याच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाची निर्मीती झाली. शिवसेनेचे काही आमदार एकनाथ शिंदेसोबत गेले. भावना गवळीही ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत गेल्या. भावना गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले आहे. त्यामुळे खासदार भावना गवळी यांना मोठा झटका बसला आहे.
महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती आयकर विभागाने गोठवली आहेत. 29 डिसेंबर रोजी आयकर विभागाने भावना गवळी यांना नोटीस दिली होती. त्यासंदर्भात पाच जानेवारीपर्यंत आपलं म्हणणं मांडायला सांगितले होतं. मात्र भावना गवळी प्रत्यक्ष उपस्थित न राहता त्यांनी प्रतिनिधी पाठवला आयकर विभागाला त्यावर समाधान झालं नाही. त्यानंतर अखेर महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती गोठवली गेलीत.
नेमक काय प्रकरण?
भावना गवळी यांच्या संस्थेवर याआधी छापे पडले होते. 8.26 कोटी रुपयांचा आयकर न भरल्यामुळे अखेर भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती गोठवण्यात आली आहेत. संस्थेत 24 कोटी रुपयांची अफरातफर आणि त्यातून सात कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार 12 मे 2020 रोजी गवळी यांनी रिसोड पोलीस ठाण्यात दिली होती. तपास केला असता आयकर भरला नसल्याची बाबसमोर आली. त्यानंतर आयकर विभागाने ही कारवाई केली.