नागपूर : सध्या भारतात पहिल्यादांच राम अवतरत आहे की काय असे वातावरण आहे. रामावर एवढच प्रेम असेल तर सीतामाईच संरक्षण करा, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच पुढे बोलताना वाढत्या महिला अत्याचारावर चिंता व्यक्त करत ड्रग्जच्या प्रकरणावर देखील मिश्कील टिप्पणी केली आहे. सध्या उडता पंजाब, उडता महाराष्ट्र झाला आहे, असही ते म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले, राज्यातील बलात्काराच्या घटनेत गेल्या काही दिवसात वाढ होताना दिसत आहे. बलात्काराच्या घटनेत आपलं राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. सत्ता राहिली तर लवकरच पहिल्या क्रमांकावर येईल. महिलांची सुरक्षा धोक्यात आली असून राज्यात कायदा सुवस्था बिघडली आहे. बिहार राज्याला आपण बोलायचो आता आपल्या राज्यात ती स्थिती निर्माण झाली आहे.
घटना घडली तर गुन्हा दाखल करायचा नाही. गुन्हा दाखल झाला तर तपास करायचा नाही, अशी परिस्थिती आहे. ललित पाटील प्रकरणात मंत्री त्याला अॅडमिट करतो, नंतर त्याला पळून जायला मदत करतो. अशी गुन्ह्याची स्थिती असून सध्या उडता पंजाब, उडता महाराष्ट्र झाला आहे. असं म्हणत जयंत पाटलांनी भाजपवर निष्ण साधला.