मलकापूर: शेतकरी नेते रविकांत तुपकर हे विविध आंदोलनं करत आहेत. याबाबतीत राज्य शासन स्तरावर त्यांची बैठकसुद्धा झाली. परंतु आपल्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत रविकांत तुपकरांनी शुक्रवारी मलकापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली आहे.
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यासाठी गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून शेतकरी नेते रविकांत तुपकर विविध आंदोलने करत आहे. याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठकही झाली होती. परंतु, त्यानंतरही आपल्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रविकांत तुपकरांनी केला. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी रेल रोको आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं.