घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील बानोबी शरफोद्दीन सोलंकी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने गुरुवारी निधन झाले. त्या 65 वर्षाच्या होत्या. बानोबी शरफोद्दीन सोलंकी ह्या पुणे प्राईम न्युजचे घाटंजी बातमीदार अयनुद्दीन सोलंकी यांच्या काकी होत्या.
सोलंकी यांच्या कुटूंबियाचे सांत्वन करण्यासाठी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस बाळासाहेब उर्फ जितेंद्र मोघे, आर्णी-केळापूरचे माजी आमदार प्रा. राजू तोडसाम, भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक यमसनवार, रमेश यमसनवार, माजी सरपंच नरसिंगराव मुत्यलवार, सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी शामराव मुत्यलवार या सह अनेकांनी मुलगा अमजद सोलंकी याची भेट घेऊन त्यांच्या कुटूंबियाचे सांत्वन केले. त्यांचे पश्चात मुलगा, दोन मुली, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.