Wardha Crime : वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील वाघोडी येथे सात ते आठ दरोडेखोरांनी रात्री सशस्त्र दरोडा टाकून शेतकऱ्यावर चाकूने वार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. फार्म हाऊस येथे सोने आणि तब्बल 55 सोयाबीनची पोती चोरी केली.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नागपूर येथील नारायण गोपाल पालिवाल या शेतकऱ्याचे नारा शिवार येथे फार्म हाऊस आहे. सात ते आठ दरोडेखोरांनी शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकला. ५५ पोते सोयाबीन तसेच सोन्याचे दागिने लुटून फार्म हाऊसवरील एकाच्या पोटात धारदार शस्त्राने भोसकून गंभीर जखमी केले. आठवड्यातून एकदा ते या फार्महाऊस वर येत असतात. शेतीचे उत्पन्न याच फार्महाऊसवर ठेवलेले असतात. रविवारी देखील नारायण पालिवाल आणि त्यांचा मुलगा गोपाल पालिवाल नारायण यांची पत्नी हरिकुमारी पालिवाल हे सर्व जण त्यांच्या फार्म हाऊसवर गेले होते.
मध्यरात्री सात ते आठ दरोडेखोरांनी त्यांच्या फार्म हाऊसवर दरोडा घातला. फार्महाऊसचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडताच, पात ते सहा जण चाकूचा धाक दाखवत आत घुसत सर्वांना मारण्यास सुरुवात केली. झटापटीत दरोडेखोरांनी नारायण यांच्या मुलगा गोपाल यांच्या पोटात चाकू खुपसला. ते या घटनेत गंभीर जखमी झाले. नारायण यांची पत्नी हरिकुमारी पालिवाल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील दागिने हिसकावले. तसेच ५५ पोती सोयाबीन चोरी केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनासाठली दाखल झाले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.