Anil Deshmukh: यवतमाळ : राज्यातील शेतकर्यांवर अवकाळीचे संकट कोसळले आहे. त्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचाही समावेश आहे. शासन कापसाची निर्यात करू न शकल्याने दर कमी झाले आहेत. त्याचा फटका कष्टकरी शेतकऱ्याला भोगावा लागत आहे. याविषयावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र व राज्य शासनावर केला. शासन कापसाची निर्यात करू न शकल्याने दर कमी झाले आहेत असा आरोप अनिल देशमुख यांनी केंद्र व राज्य शासनावर केला आहे. अवकाळी पावसामुळे लाखो हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले आहे. शेतकरी अतिवृष्टी व आता अवकाळीने त्रस्त झाले असताना सत्ताधारी इतर राज्यांतील निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. असही त्यांनी म्हटल आहे.
येथील शासकीय विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत अनिल देशमुख बोलत होते. देशमुख पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. सन २०२२मध्ये २७२ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर २०२३ वर्षांत आतापर्यंत १८३ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी सत्ताधारी निवडणुकीचा प्रचार करीत आहेत.
केंद्र शासनाने आधारभूत किंमती जाहीर केल्या. त्या अत्यंत कमी आहेत. कापसाला ६ हजार 620 रुपये, तर सोयाबीनला ४ हजार 600 रुपये दर दिला जात असल्याचा आरोप श्री. देशमुख यांनी केला. कंत्राटी आरोग्य कर्मचारी सव्वा महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. त्याकडे शासनाचे लक्ष नाही, शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही, कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल बंद असून, शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधार्यांना वेळ नसल्याचा आरोपही अनिल देशमुख यांनी केला.