Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाण्याच्या टाकीत आढळलं मृत माकड, चार दिवस गावकऱ्यांना दूषित पाणीपुरवठा; ग्रामपंचायतीवर संताप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 18 April 2026, 12:32

Akola News: अकोला : जिल्ह्यातील खिरपुरी बुद्रुक ग्रामपंचायतीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत एक माकड मृत अवस्थेत चार दिवस पडून असल्याचे आढळले. तरीही त्याच टाकीतून ग्रामस्थांना चार दिवस घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा करण्यात आला. हा प्रकार उघड झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून गावातील नळांमधून येणाऱ्या पाण्याला तीव्र दुर्गंध येत होता. पाण्याचा रंगही बदललेला दिसत होता. त्यामुळे ग्रामस्थांनी पाणी टाकीची तपासणी केली. तपासणीदरम्यान टाकीत माकड मृत अवस्थेत आढळले. हा प्रकार चार दिवसांपासून सुरू असल्याचे समोर आले आहे.

या घटनेमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पिण्याच्या पाण्याची अशी दुर्दशा झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामसेवक, सरपंच आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामपंचायतीकडून पाणी टाकीची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर गावात पुन्हा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, इतक्या मोठ्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने नियमित तपासणी करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07
Next Post

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.