Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 April 2026, 12:52

फुरसुंगी, ता. 18 : लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच “5 लाख रुपये आणि 8 तोळे सोने आण” अशी मागणी करत नवविवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची संतापजनक घटना फुरसुंगी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात पती, सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती राज किशोरचंद्र दादा (वय 34), सासू आशाबेन दादा आणि सासरे किशोरचंद्र दादा (सर्व रा. फुरसुंगी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या 28 वर्षांच्या असून सध्या त्या माहेरी वास्तव्यास आहेत. त्यांचे पहिले लग्न तुटल्यानंतर कुटुंबियांनी विवाह संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांचे दुसरे लग्न राज किशोरचंद्र दादा (वय 34, रा. फुरसुंगी) याच्याशी 14 फेब्रुवारी 2026 रोजी आर्य समाज मंदिर, पिंपरी-चिंचवड येथे लावून दिले होते. लग्नानंतर पूजा या पतीसह फुरसुंगी येथील सासरी राहायला गेल्या. सुरुवातीला काही दिवस संसार सुरळीत सुरू होता. मात्र, त्यानंतर पती, सासू आणि सासरे यांनी “लग्नात माहेरकडून काहीच मिळाले नाही” असे टोमणे मारत 5 लाख रुपये आणि 8 तोळे सोन्याची मागणी सुरू केली.

पीडितेने ही मागणी नाकारल्याने तिचा छळ सुरू झाला. पती राज दादा हा वारंवार शिवीगाळ करत मारहाण करत होता, तर सासू-सासरेही या छळात सहभागी होते. “तू तुझ्या बापाकडून पैसे घेऊन ये, नाहीतर येथे राहू नकोस,” असे सांगत तिला मानसिक त्रास दिला जात होता. घटनेत आणखी धक्कादायक बाब म्हणजे, 16 मार्च 2026 रोजी पतीने तिच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र आणि तीन तोळ्यांचे नेकलेस जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर तिला माहेरी नेऊन “जोपर्यंत पैसे आणि दागिने देत नाही, तोपर्यंत आम्ही तिला नांदवणार नाही,” असे सांगत सासरच्यांनी तिला तेथेच सोडून दिले.

तेव्हापासून पीडिता आपल्या आई-वडिलांसोबत राहत असून, अखेर तिने फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पती राज दादा, सासू आशाबेन दादा आणि सासरे किशोरचंद्र दादा यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 115(2), 3(5), 352 आणि 85 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.