Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 April 2026, 12:56
Fursungi

photo- ai

Fursungi : घर बांधण्याचे स्वप्न दाखवून एका महिलेकडून तब्बल 62 लाखांहून अधिक रक्कम उकळून जमीन न देता फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार फुरसुंगी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सुयोग प्रकाश खळदकर आणि अश्विनी सुयोग खळदकर (दोघेही रा. ग्रीण किस्टा सोसायटी, भोसले व्हिलेज भेकराईनगर, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दाम्पत्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोपीला शेरबहादुर राणा (वय 47, रा. गोंधळेनगर, हडपसर) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोपीलाराणा या गेल्या 30 वर्षांपासून गोंधळेनगर परिसरात वास्तव्यास आहेत. कुटुंबासाठी मोठे घर बांधण्याच्या उद्देशाने त्या 2021 पासून फुरसुंगी भागात जागेच्या शोधात होत्या. याच दरम्यान त्यांची ओळख गौतम कांबळे या इसमाशी झाली. त्याने आपल्या मित्राची फुरसुंगी येथे जागा असल्याचे सांगत सुयोग प्रकाश खळदकर याची ओळख करून दिली. खळदकर याने फुरसुंगी येथील सर्व्हे नं. 183, हिस्सा नं. 13/1अ येथील जागा दाखवून ती आपल्या आजी सरस्वती हरपळे यांच्या नावावर असून ती स्वतःच्या नावावर केल्याचे सांगितले.

सदर जागा पसंत पडल्याने राणा यांनी 2.5 गुंठे जागा घेण्याचा निर्णय घेतला. प्रति गुंठा 30 लाख दराने एकूण 75 लाख रुपयांत व्यवहार ठरला. त्यानुसार राणा यांनी 13 डिसेंबर 2021 पासून ते 25 एप्रिल 2024 पर्यंत विविध टप्प्यांमध्ये चेक आणि ऑनलाईन पद्धतीने एकूण 57 लाखांहून अधिक रक्कम अदा केली. तसेच करारनाम्यासाठी 7 लाख रुपये रोख दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. एकूण मिळून त्यांनी सुमारे 62 लाख 90 हजार 800 रुपये दिले.

दरम्यान, 20 डिसेंबर 2021 रोजी हवेली येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कुलमुखत्यारपत्र व विकास करारनामा करण्यात आला. मात्र, एवढी मोठी रक्कम देऊनही खळदकर यांनी ना जागा ताब्यात दिली, ना पैसे परत केले. वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राणा यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पैसे मागण्यासाठी गेल्यावर आरोपींनी शिवीगाळ करत धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी सुयोग प्रकाश खळदकर आणि अश्विनी सुयोग खळदकर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 3(5), 318(4), 351(2) आणि 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57
Next Post

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.