नागपूर : आगामी लोकसभा निवडणूकांची रणधूमाळी राज्यात पहायला मिळत आहे. जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे.
राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि भाजप यांच्यात जागांच वाटप अजून झालेलं नाही. त्यामुळे आता विदर्भातील तीन जागांवर अजित पवार गट, भाजपकडून दावा करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विदर्भातील 10 पैकी 3 जागेवर दावा करण्यात आला आहे. या जागांमध्ये भंडारा-गोंदिया, गडचिरोली यांचा समावेश आहे. तर वर्धा जिल्ह्यात तिन्ही जागेवर भाजपचे खासदार आहेत. ज्या ठिकाणी भाजपचे विद्यमान खासगार आहेत. त्याठिकाणी अजित पवार गटाकडून जांगांसाठी दावा करण्यात येत आहे.
यात भाजपचे विद्यामान खासदार अशोक नेते यांचा जागेचा समावेश आहे. अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री धर्मराव बाबा यांनी स्वतः या जागेसाठी इच्छुक असल्याच सांगतीलं आहे. तसेच भंडारा-गोंदिया या ठिकाणी भाजपचे सुनील मेंढे विद्यमान खासदार आहेत, पण याठिकाणी सुद्धा अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आगे. तिथे प्रफुल पटेल यांच्यासाठी ही जागा मागण्याची अजित पवार गटाची तयारी आहे.
तसेच वर्ध्यात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आहेत. असे असताना देखील या ठिकाणी या जागेची देखील अजित पवार गटाकडून मागणी केली जात आहे. त्याठिकाणी माजी केंद्रीय मंत्री राहिलेले सुबोध मोहिते हे स्वतः तयारी करत असून वर्धा लोकसभा मतदार संघातील अनेक लोकांच्या संपर्कात ते आहेत.