अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : गडचिरोली जिल्ह्यातील अर्जुनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी राजू घोडके यांची प्रशासकीय कारणाने घाटंजी नगर परिषदेत १६ ऑगस्ट २०२४ रोजी प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. राजु घोडके यांच्या बदलीचे राज्यपालाच्या आदेशाने व नावाने नगर विकास विभागाचे शासनाने अवर सचिव अ. का. लक्कस यांनी १६ ऑगस्ट २०२४ रोजी प्रशासकीय बदलीचे आदेश दिले आहे. पांढरकवडा नगर परिषदेत यशस्वी पणे मुख्याधिकारी पदाची जबाबदारी सांभाळणारे पांढरकवडा तहसीलचे नायब तहसीलदार राजु मोट्टेमवार यांच्या कडे ७ महिन्यापुर्वी घाटंजी नगर परिषदेचा पदभार देण्यात आला होता. त्यांनी शहराच्या विकासाबरोबरच अनेक शासनाचे उपक्रम घाटंजी शहरात राबविले.
नायब तहसीलदार (पांढरकवडा) राजु मोट्टेमवार हे घाटंजी नगर परिषदेत प्रशासक तथा मुख्याधिकारी म्हणून त्यांचा कार्यकाळ चांगला राहीला आहे. ते घाटंजी नगर परिषदेत ७ महिने कार्यरत होते, हे येथे उल्लेखनीय. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील कलम ४ (४) व ४ (५) मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी, गट – ब संवर्गातील अधिकाऱ्याची प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिका-याच्या मान्यतेने बदली करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अर्जुनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी राजु घोडके यांना दि. १६ ऑगस्ट २०२४ पासून त्याच्या सध्याच्या पदावरुन कार्यमुक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांची पदस्थापना दिलेल्या पदावर दि. १९ ऑगस्ट २०२४ रोजी रुजू होऊन तसा अनुपालन अहवाल शासनास तात्काळ सादर करावा, असे नगर विकास विभागाचे शासनाचे अवर सचिव अ. का. लक्कस यांनी प्रशासकीय बदली आदेशात नमूद केले आहे. सदर आदेशाच्या प्रती आयुक्त तथा संचालक, विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी यवतमाळ, प्रशासक तथा मुख्याधिकारी घाटंजी व इतरांना देण्यात आले आहे.