मुंबई : राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
1. राजेंद्र भोसले , IAS (२००८ ) अहमदनगरचे जिल्हाधिकारी ते मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
2. दिपा मुधोळ मुंडे , IAS (२०११ ) औरंगाबाद CIDCO मुख्य प्रशासक ते आता बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
3. राधाविनोद शर्मा , IAS (२०११) बीड जिल्हाधिकारी ते औरंगाबाद CIDCO च्या मुख्य प्रशासकपदी नियुक्ती.
4. सिद्धार्थ सालीमथ , IAS (२०११ ) अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
5. निधी चौधरी , IAS (२०१२ ) मुंबई उपनगर जिल्हाधिकारी ते मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह-आयुक्तपदी नियुक्ती.