मुंबई : महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कळवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
१० मार्च रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे . युवराज संभाजीराजे अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, धनंजय पवार, अशोक पवार, घनश्याम पवार, हरिभाऊ वाघ, विनोद खैरनार, चंद्रकांत पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित असणार आहे.
दरम्यान, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपतींची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांना नमन करण्यासाठी लाखो शिवप्रेमी गडावर दाखल झाले होते.