Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील कस्तुरी ग्रुपच्या ‘भिंत कस्तुरीची’ ठरली ऊसतोड कामगारांसाठी आशेचा किरण ; मॉलसारख्या वस्तू घेताना चेहऱ्यावर फुलला आनंद

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 26 September 2026, 18:36

उरुळी कांचन : “ज्यांच्यासाठी दररोजचा दिवस हा जगण्याचा संघर्ष असतो, त्यांच्या चेहऱ्यावर हक्काच्या वस्तू मिळताच फुललेला आनंद हीच आमच्या कामाची खरी पावती आहे. “या भावनेची प्रचिती उरुळी कांचन (ता. हवेली) येथील कस्तुरी ग्रुपच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘भिंत कस्तुरीची’ या सामाजिक उपक्रमातून पुन्हा एकदा आली आहे.

मागील काही वर्षांपासून सातत्याने समाजोपयोगी काम करणाऱ्या कस्तुरी ग्रुपच्या ‘भिंत कस्तुरीची’ या उपक्रमाला परिसरात दाखल झालेल्या ऊसतोड कामगारांच्या टोळीने या उपक्रमाला भेट दिली. एखाद्या अद्ययावत शॉपिंग मॉलमध्ये मोकळेपणाने खरेदी करावी, तशाच आनंदाने आणि अभिमानाने या कामगारांनी आपल्या गरजेनुसार कपडे, संसारोपयोगी भांडी आणि चपलांची निवड केली.

कडक उन्हात आणि अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात अशा प्रकारे आनंदाचे क्षण निर्माण झाल्याने उपस्थित सर्वच जण भावूक झाले होते. केवळ मदत म्हणून न देता, गरजू व्यक्तीला सन्मानाने स्वतःच्या आवडीची वस्तू निवडण्याचा हक्क या उपक्रमाद्वारे दिला जातो.

दात्यांनी दिलेल्या वस्तू जेव्हा थेट अशा खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतात, तेव्हा ‘टीम कस्तुरी’च्या मेहनतीचे सार्थक झाल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली. “दात्यांचे औदार्य आणि टीम कस्तुरीचे नियोजन यामुळेच हा माणुसकीचा यज्ञ अविरत सुरू आहे. ज्या डोनर्समुळे हे सर्व शक्य झाले, त्या सर्वांचे कस्तुरी ग्रुपच्या वतीने आभार मानण्यात आले. कस्तुरी ग्रुपच्या या संवेदनशील उपक्रमाचे आणि ऊसतोड कामगारांना दिलेल्या या अनमोल आनंदाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06

खराडीत विनापरवाना डीजेवर पोलिसांचा दणका; चार जणांविरुद्ध गुन्हा तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 19:39

3 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार? उद्यापासून कर्मचाऱ्यांचा संप; ATM- UPI बाबत महत्त्वाची अपडेट

Sunday, 27 September 2026, 18:32

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपणार! भाजपचे उमेदवार 48 तासांत जाहीर होणार?

Sunday, 27 September 2026, 17:48
Next Post

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; लोणी काळभोर येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp