Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपणार! भाजपचे उमेदवार 48 तासांत जाहीर होणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 27 September 2026, 17:48

पुणे : महाराष्ट्रातील मुदत संपणाऱ्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक अशा एकूण 5 विधानपरिषद जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीची अंतिम मुदत 26 सप्टेंबर 2026 ही होती. लवकरच यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.या निवडणुकीच्या निमित्ताने विशेषतः पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीवर,उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, हे दोन्ही मतदारसंघ पारंपरिकदृष्ट्या भाजपचेच राहिले आहेत. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. शीर्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल आणि महायुतीचे दोन्ही अधिकृत उमेदवार येत्या दोन दिवसांत जाहीर होतील,असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

दुसरीकडे, उमेदवारी मिळवण्यासाठी विविध नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघासाठी दावा केला आहे, तर सचिन सानप आणि कौस्तुभ गावडे यांनीही तयारी दर्शवली आहे. त्याचसोबत महाविकास आघाडी या निवडणुकांमध्ये कोणाला संधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ठरलेल्या वेळापत्रकानुसार 23 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी आणि निकाल घोषित केले जाणार आहेत.

2020 मध्ये झालेल्या गेल्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी महाविकास आघाडीने या दोन्ही जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड पुणे पदवीधरमधून, तर काँग्रेसचे जयंत आसगावकर पुणे शिक्षक मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, आता राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे या बदललेल्या राजकीय वातावरणात रंगणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उसाच्या चोथ्यातून सॅनिटरी पॅड; धारावीच्या विद्यार्थ्यांची कल्पक भरारी

Sunday, 4 October 2026, 9:46

MPSC विद्यार्थ्यांसाठी राज ठाकरे पुण्यात येणार; भेटीची तारीख समोर,विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार…

Sunday, 4 October 2026, 8:46

नावानं हाक मारली अन् मित्रच पिसाळला!पुण्यात मित्राने आधी कुत्रा सोडला,, मग गाडीत नेऊन अमानुष मारहाण..

Sunday, 4 October 2026, 8:28

पुणे पदवीधरवरून महायुतीत ठिणगी! राष्ट्रवादीचा दावा ठाम; सुनिल टिंगरेंनी भूमिका स्पष्ट केली…

Sunday, 4 October 2026, 8:13

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा;पोस्ट करत म्हणाले, “विद्यार्थ्यांचा आवाज…

Sunday, 4 October 2026, 7:56

अंधाराचा फायदा घेत चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; शेतात ओढत नेलं, गावकरी धावले पण तोपर्यंत सगळंच…

Sunday, 4 October 2026, 7:38
Next Post

3 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार? उद्यापासून कर्मचाऱ्यांचा संप; ATM- UPI बाबत महत्त्वाची अपडेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp