Thane News ; ठाणे : आसनगाव रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घडली आहे. मालगाडी महिलेच्या अंगावरून गेल्याने महिलेचे हात-पाय धडावेगळे झाले आहेत. या प्रकरणी संबंधित महिलेला तातडीने सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.
आसनगाव स्थानकावर थरार!
अपघातग्रस्त महिलेचे नाव विद्या वाखारीकर (वय ५३, रा. आसनगाव) असे आहे. त्या रुग्णालयात नर्स आहेत. शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे विद्या वाखारीकर आपल्या कुटूंबासह राहतात. त्या मुंबईतील सायन भागात असलेल्या लोकमान्य टिळक रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहेत. (Thane News) नोकरीनिमित्त त्या आसनगाव ते सायन रेल्वेस्थानकापर्यंत लोकलने प्रवास करतात.
दरम्यान, शनिवारी रुग्णालयात सकाळची ड्युटी असल्याने त्या नेहमीप्रमाणे कसाऱ्याहून आसनगाव रेल्वे स्थानकात पहाटे ४ वाजून २८ मिनिटांनी येणाऱ्या कसारा लोकलने मुंबईला निघाल्या होत्या.
आसनगाव रेल्वे स्थानकाच्या फलाटावर जाण्यासाठी पूर्वेला पादचारी पूल आहे. येथून स्टेशन गाठण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागतो. कामावर जायला उशीर होऊ नये म्हणून त्या रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीखालून फलाटावर जात होत्या. त्याचवेळी मालगाडी सुरू झाली. (Thane News) मालगाडी त्यांच्या डाव्या हातावरुन तसेच डाव्या पायावरुन गेल्याने त्यांचे हात व पाय धडावेगळे झाले.
समोरचे दृश्य पाहून फलाटावरील मुलाने इतर प्रवाशांच्या मदतीने आरडाओरडा केली. गंभीर जखमी झालेल्या वाखरीकर यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात, नंतर सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे. (Thane News) शिवाय, त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत, असे कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वरिष्ठ सल्लागार अनिता झोपे यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Thane News : कल्याण-डोंबिवलीसाठी युतीतील दोन नेते आमने-सामने; निवडणूकीपूर्वीच वाद विकोपाला जाणार?
Pune News : आर.एस.एस.चे माजी प्रभारी मदनदास देवी यांचे निधन; पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त!