Thane News : ठाणे : अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कथित घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम हे तुरुंगात शिक्षा भोगत होते. मात्र, तब्बल ८ वर्षांनंतर त्यांना न्यायालयाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला असून, आता तुरुंगाबाहेर जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. जामिनावर बाहेर येताच समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
जामिनावर बाहेर येताच समर्थकांकडून जंगी स्वागत
रमेश कदम हे गेल्या 8 वर्षांपासून ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कथित 312 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ते तुरुंगात होते. त्यांना न्यायालयाकडून एका महिन्यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता. (Thane News) त्यानंतर आता रविवारी त्यांची कारागृहातून सुटका झाली. कदम यांच्या सुटकेनंतर समर्थकांकडून ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.
दरम्यान, सोलापूर, मुंबई, ठाण्यातून अनेक कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी आले होते. (Thane News) कदम यांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर अखेर रमेश कदम हे तुरुंगाबाहेर आले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Thane News : मालगाडी अंगावरून गेली अन् क्षणात महिलेचे हात-पाय धडावेगळे झाले
Thane News : कल्याण-डोंबिवलीसाठी युतीतील दोन नेते आमने-सामने; निवडणूकीपूर्वीच वाद विकोपाला जाणार?