महाराष्ट्र: पुण्यातील दिनानाथ रुग्णालयाच्या कथित निष्काळजीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसेचा आगाऊ शुल्क न भरल्यामुळे उपचार नाही केले. नंतर तिने दुसऱ्या रुग्णालयात जुळ्या मुलींना जन्म दिला, परंतु गुंतागुंतीमुळे तिचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित महिलेचे पती, नणंद आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेतली.
फडणवीस यांनी मृत महिलेच्या कुटुंबियांचीही भेट घेतली आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, एक्सवर माहिती देत त्यांनी सांगितले कि, “आज त्या कुटुंबापुढे सर्वांत मोठा प्रश्न, त्या जन्माला आलेल्या दोन अपत्यांच्या आरोग्याचा आहे. मुदतपूर्व प्रसुतीमुळे ही दोन्ही अपत्य आज ‘एनआयसीयू’मध्ये आहेत आणि आणखी काही काळ त्यांना तेथे उपचार घ्यावे लागणार आहेत. त्याचा खर्च सुद्धा अधिक आहे. त्यामुळे त्या दोन्ही मुलींचा उपचारांचा खर्च हा मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश मी दिले आहेत.,” असे फडणवीस म्हणाले आहे.
येथे पाहा पोस्ट:
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काल झालेल्या प्रकाराची माहिती मी आज भिसे कुटुंबीयांकडून घेतली. या प्रकरणात संपूर्ण चौकशी होईलच आणि अहवालानुसार कारवाई सुद्धा.
पण, आज त्या कुटुंबापुढे सर्वांत मोठा प्रश्न, त्या जन्माला आलेल्या दोन अपत्यांच्या आरोग्याचा आहे. मुदतपूर्व प्रसुतीमुळे ही… pic.twitter.com/oCANumoM8K— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 5, 2025
या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे, अनेकांनी रुग्णालय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही जुळ्या मुलींवरील उपचाराचा खर्च उचलण्याची घोषणा केली आहे, ज्यांची प्रकृती सध्या नाजूक आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील आरोग्यसेवेच्या स्थितीबद्दल आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर नियमांची आवश्यकता समोर येते.