Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ बहिणीचा प्लॉट केला पत्नीच्या नावावर; सख्ख्या बहिणीची फसवणूक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 8 July 2025, 19:36

बीड: बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातून विश्वासाला तडा देणारी आणि कुटुंबातील नात्यांवर काळोखी सावली टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माजलगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अशोक होके यांनी स्वतःच्या सख्ख्या बहिणीची फसवणूक करत तिच्या नावे असलेला मौल्यवान प्लॉट बनावट कागदपत्रांच्या आधारे थेट आपल्या पत्नीच्या नावावर करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात अशोक होके, त्यांच्या पत्नी उज्ज्वला होके यांच्यासह नगरपालिकेतील तीन तत्कालीन कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फिर्यादी महिलेच्या मालकीचा एक प्लॉट माजलगाव शहरात असून, तिच्यावर विश्वास ठेवून माजी नगराध्यक्ष अशोक होके यांनी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांशी संगनमत करत खोटी कागदपत्रे तयार केली. या बनावट कागदपत्रांमध्ये 100 रुपयांच्या बॉण्ड पेपरवर खोट्या सह्या करून हक्क सोडपत्र दाखवण्यात आले. त्या आधारे प्लॉटचा मालकीहक्क बदलत थेट उज्ज्वला होके यांच्या नावे हस्तांतर करण्यात आला.

सदर प्रकार सुरू असतानाच बहिणीच्या निदर्शनास ही फसवणूक आली. तिने तत्काळ संबंधित कागदपत्रांची चौकशी करून प्लॉटच्या मालकीहक्काबाबत माहिती घेतली आणि हे सर्व प्रकरण उघडकीस आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच तिने माजलगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि यासंदर्भात सविस्तर तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक तपास करून अशोक होके, त्यांची पत्नी उज्ज्वला होके तसेच नगरपालिकेचे तीन कर्मचारी यांच्या विरोधात फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, खोट्या सह्यांचा वापर करणे अशा विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, प्लॉट हस्तांतरणातील सर्व दस्तऐवज आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

एकीकडे राजकीय पद भूषवलेले आणि जनतेच्या सेवेची जबाबदारी असलेले व्यक्ती जर नात्यांचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारचे फसवेगिरीचे प्रकार करत असतील, तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्नही नागरिकांतून उपस्थित होत आहे. माजी नगराध्यक्षांनीच सख्ख्या बहिणीचा विश्वासघात करून मालमत्तेवर डोळा ठेवण्याचा प्रकार केल्याने या घटनेची सर्वत्र तीव्र चर्चा सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Murder News : फुलांनी सजलेल्या गाडीत गोळीबार, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या; आनंदाचे रूपांतर शोकांत

Sunday, 3 May 2026, 13:46

Missing Link : खबरदार! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’वर गाडी थांबवली तर थेट कारवाई ; AI च्या नजरेतून सुटका नाही”

Sunday, 3 May 2026, 13:42

Pune Nasrapur Case : “न्याय मिळत नाही तोपर्यंत नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये”; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची भावनिक विनंती”

Sunday, 3 May 2026, 13:15
Man murdered his wife and daughter in pune

Pune Crime News : धायरीत कौटुंबिक वादातून सासऱ्याकडून सुनेचा खून ; आरोपी फरार”

Sunday, 3 May 2026, 13:04

Delhi Judge Suicide : ‘पप्पा, जगणं अवघड झालंय…’ फोननंतर काही तासांतच न्यायाधीशाची आत्महत्या; वैवाहिक वादाचा संशय”

Sunday, 3 May 2026, 12:16

Pune News : हिंजवडीत सुरक्षारक्षकाकडून चिमुरडीशी गैरवर्तन, आरोपी अटकेत

Sunday, 3 May 2026, 12:09
Next Post

 Pune PMC News: महापालिकेला पहिल्या सव्वा दोन महिन्यांत १,४११ कोटींचे उत्पन्न; मिळकत कर वसुलीत चांगला प्रतिसाद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.