Samruddhi Highway Bus Accident : बुलढाण्यातील सिंदेखड राजा येथे झालेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे देशात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताबाबत अमरावती परिवहन विभागान महत्त्वाचा खुलासा केला आहे.
डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतला
बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतला आणि वेळातच प्रवाशांसह ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. या अपघातानंतर आता विविध कारणे समोर येत आहेत.
नागपुरवरुन ही विदर्भ ट्रॅव्हल्स ही बस समृद्धी महामार्गावरुन पुण्याकडे येत होती. मात्र शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बसचा टायर फुटल्याने महामार्गाच्या पुलावरील दुभाजकाला धडकली. (Samruddhi Highway Bus Accident) या धडकेनंतर बसमधील डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतला. काही क्षणातच बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता अमरावती परिवहन विभागान या अपघाताबाबत महत्त्वाची माहिती दिली.
ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार ही बस उजव्या बाजूला असलेल्या लोखंडी पोलवर जाऊन आढळली. यामुळे ड्रायव्हरचे संतुलन बिघडले व चालकाच्या उजव्या बाजूचे चाक दुभाजकावर आदळले. (Samruddhi Highway Bus Accident) यामुळे बसचे एक्सेल तुटले आणि बसचा डिझेल टँक फुटला. बसचे एक्सेल तुटल्यामुळे बस सिमेंट रोडवरून घसरत गेली. त्यानंतर आधीच गरम असलेल्या इंजिन ऑइलने पेट घेतला. एका क्षणात संपूर्ण बसणे पेट घेतला. बस डाव्या बाजूने उलटल्याने बसचे इमर्जन्सी दरवाजे उघडता आले नाहीत.
महत्त्वाची बाब म्हणजे टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याचे असे प्रत्यक्षदर्शीयांना कुठेही आढळले नाही. कारण कुठेही टायरचे तुकडे पडलेले दिसले नाहीत. तसेच अतिवेगामुळे अपघात झाल्याचे देखील कुठेही आढळले नाही. (Samruddhi Highway Bus Accident) ही बस रात्री 11.08 मिनिटांनी समृद्धी महामार्गावर आली आणि 1.32 मिनिटांनी हा अपघात झाला. या बसने 152 किलोमीटर अंतर दोन तास 24 मिनिटांमध्ये पार केले होते. तर बसचा वेग हा 70 किलोमीटर प्रति तास होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अपहरण करुन खून करण्याच्या प्रयत्नातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Pune News : डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हनीट्रॅप प्रकरण: केसमधील मोठी माहिती आली समोर