पुणे : राज्यात उकाड्यासह उन्हाच्या चटक्यापासून सर्वांना दिलासा मिळणार आहे. आज राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्व मॉन्सून असल्याचा हवामान खात्याचा दावा आहे.
राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडटांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यात मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले असून मान्सून अरबी समुद्राच्या मध्य भागात सक्रीय असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) प्रवेशद्वारावर महाराष्ट्राच्या असलेल्या गोव्यात दाखल झाले असतानाच महाराष्ट्रात आद वादळी वा-यासह पावसाच्या सरी पडतील. आज राज्यात तळ कोकणासह बहुतांश ठिकाणी वादळी वा-यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे नंदुरबार, जळगाव, मुंबई व पालघर हे जिल्हे वगळता हवामान विभागाने उर्वरित राज्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.