Pune News : पुणे : शासकीय कार्यालयात हजर असलेल्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना आता आपले ओळखपत्र दर्शनी भागत लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. आदेश न पाळल्यास थेट प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा आदेश जारी केला आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे आदेश
राज्यातील सर्वसामान्य नागरिक कामाच्या निमित्ताने विविध शासकीय कार्यालयांमध्ये येत असतात. नागरिकांना त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नाव आणि पद माहीत व्हावे, यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
सरकारी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या सामान्य व्यक्तीने अधिकाऱ्यांना नाव विचारले तरी अनेकदा ते आपली ओळख सांगत नाहीत किंवा ओळखपत्र विचारले तरी ते दाखवीत नाहीत. (Pune News ) यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी, सामान्य प्रशासन विभागाकडून कर्मचाऱ्यांना कार्यालयात असताना ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, ओळखपत्रे दर्शनी भागावर आहेत की नाही, हे पोलीस अधिकाऱ्यांनी तपासावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडिओ दाखवून लैंगिक शोषण
Pune News : प्राईड हॉटेलच्या जलतरण तलावात बुडून प्राध्यापकाचा मृत्यू; सहा महिन्यांनंतर घटना उघड
Pune News : कासव, पोपटाची तस्करी करणाऱ्याला वन्यजीव विभागाने घेतले ताब्यात