सोलापूर : पुणे आणि सोलापूर येथील प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने अतिशय गोड बातमी दिली आहे. सोलापूर- मुंबई ‘वंदे भारत’एक्सप्रेस ११ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. म्हणून पुणे आणि सोलापूरकर लवकरच घेणार‘वंदे भारत’एक्सप्रेसच्या प्रवासाचा आनंद घेणार आहेत. अवघ्या साडेसहा तासात मुंबई – सोलापूर प्रवास प्रवाश्यांना करता येणार आहे. यामुळे हजारो प्रा प्रवाश्यांना याचा फायदा होणार आहे.
सोलापूर- मुंबई ‘वंदे भारत’एक्सप्रेस ही १८ डब्यांची असणार आहे. ही एक्सप्रेस सोलापूर स्थानकातून बुधवारी (ता.११) सकाळी ६. वाजून ५ मिनिटांनी मुंबईच्या दिशेने निघेल आणि दुपारी साडेबारापर्यंत मुंबईत पोहचेल, अशी माहिती रेल्वेच्या विश्वसनिय सूत्रांनी दिली.
दरम्यान, सोलापूर- मुंबई आणि मुंबई- शिर्डी (साईनगर) अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्या १० फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. परंतु, त्यावेळी ते मुंबईत येणार की दिल्लीतून ऑनलाइन शुभारंभ करणार, याबतीत अजून काही ठरलेले नाही.
आता ‘वंदे भारत’मुळे सोलापूरकरांना सकाळी साडेबारा वाजेपर्यंत मुंबईत जाता येणार आहे. ही रेल्वे मुंबईहून दुपारी चार वाजून १० मिनिटांनी निघेल आणि रात्री पावणेअकरा वाजता सोलापुरात पोहचणार आहे. ‘वंदे भारत’चा वेग ताशी १८० किमी आहे, पण सध्या तसा ट्रॅक नसल्याने तो वेग कमीच राहील, असे बोलले जात आहे.
‘वंदे भारत’एक्सप्रेसच्या सुविधा
वंदे भारत रेल्वेत दिव्यांग प्रवाशांसाठी व्हीलचेअरची सुविधा असणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या अन्य रेल्वे गाड्यांच्या तुलनेत ‘वंदे भारत’मध्ये प्रवाशांसाठी भरपूर सोयी असणार आहेत. त्या गाडीत स्वच्छता व टापटीपतेला प्राधान्य दिले जाते.