Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील विश्वशांती घुमटामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व तत्त्वज्ञ संत गाडगे महाराज यांचा पुतळ्याचे अनावरण..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 30 January 2023, 19:36

लोणी काळभोर, (पुणे) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा हे खरे भारतीय संस्कृतीचे रक्षक आहेत. या देशाला स्वच्छतेच्या मंत्राबरोबरच माणसात देव शोधावा असा संदेश त्यांनी दिला असल्याचे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मानवतेचे महान पुजारी तत्वज्ञ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना व अनावरण करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार, अमरावती येथील अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळ गुरूकुंज आश्रमचे सरचिटणीस जनार्दन बोथे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेचे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक, ग्रामगीताचार्य, गुरूकुंज आश्रमचे अरविंद राठोड, नागपूर येथील कृषितज्ञ प्रा. डॉ. रमेश ठाकरे, थोर विचारवंत प्रा. रतनलाल सोनाग्रा व योगेंद्र मिश्रा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, आदी उपस्थित होते.

 

यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७५व्या पुण्यतिथी निमित्ताने पुतळयाला पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली. तसेच, उल्हास पवार लिखित ‘ महात्मा गांधी आणि जग’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यापुढे बोलताना पाटील म्हणाले,“ या दोन्हीं संतांचा जन्म व मृत्यू अमरावतीत झाला. यांनी मानवतेचा व विश्व बंधुत्वाचा संदेश देऊन स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून जी २० साठी विदेशातून येणार्‍या पाहुण्यांना या विश्वशांती घुमटाला भेट देण्याची विनंती करणार आहे.

डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ साधू संतांच्या या भूमीत दोन्हीं संतांनी संपूर्ण मानवजातीला सुखी होण्याचा संदेश दिला. स्वामी विवेकानंद यांच्या नुसार २१ व्या शतकात भारत माता ही विश्वगुरू म्हणून उदयास येईल. तसेच संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल.

उल्हास पवार म्हणाले,“ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचा उल्लेख मृत्यूंजय म्हणून करावा. कारण त्यांचे विचार हे मानव जातीला तारणारे आहेत. करूणा, दया, क्षमा आणि शांती याचा खरा अर्थ जाणून त्याचा अभ्यास करावा.

डॉ. मंगेश कराड म्हणाले, संतांनी देशाला विचार दिला. त्यांच्यामुळे आम्ही विकास करू शकलो. संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि ग्राम स्वच्छतेचा विचार दिला. राष्ट्रसंतांच्या विचाराने आपल्या गावात कार्य सुरू करावे.

त्यांच्या विचाराने गावाचा विकास आणि नावलोकिकात वाढ होईल. डॉ. एस.एन.पठाण यांनी प्रास्ताविक केले. गुरूदेव सेवा मंडळाचे प्रा. सुरेंद्र नावडे यांच्या मार्गदर्शनात खंजिरी भजनाचा कार्यक्रम झाला. प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
PMRDA extends timeline of application for homes till 15 december

पीएमआरडीएच्या आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमावलीला कार्यकारी समितीची मान्यता...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.