Pandharpur News : पंढरपूर : टाळ मृंदागाच्या गजरात, तुकोबा-ज्ञानोबा असा नामघोष करत वारकरी विठूरायाच्या भेटीसाठी निघाले आहेत. एकदा तरी वारी अनुभवावी असे बोलले जाते. त्यामुळे अनेक तरुण वारकरीही पालखी सोहळ्याच सहभागी झाले आहेत. वारकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना विठूरायाटचे दर्शन प्रत्येकालाच मिळते असे नाही. त्यामुळे वारकरी विठ्ठलाचे मुखदर्शन घेतात. हेच मुखदर्शन सुलभ व्हावे, कोणाला वाट पाहू नये, यासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
एक एक टप्पा ओलांडत ही मंडळी विठ्ठलभेटीच्या आणखी नजीक पोहोचताना दिसत आहेत. त्यांच्या या प्रवासाचा शेवटचा टप्पा अतिशय मनमोहक आणि प्रचंड उत्साहानं भारावलेला असेल. (Pandharpur News) याच खास दिवशी जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल- रखुमाईचं दर्शन घेता यावं यासाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
भाविकांना आता सहजपणे विठ्ठलाचं मुखदर्शन घेता येणार
आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात येणाऱ्या असंख्य भाविकांना आता सहजपणे विठ्ठलाचं दर्शन घेण्यात येणार आहे. थोडक्यात आषाढी एकादशीच्या दिवशी आता 24 तासही विठूरायाचं मुखदर्शन घेता येणार आहे… आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न होते. (Pandharpur News) मात्र यावेळी मुखदर्शन बंद असतं. यंदाच्या वर्षी मात्र पहिल्यांदाच हा मुखदर्शनाचा प्रयोग राबवला जाणार आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यासाठी प्रशासनाला नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असून यंदाच्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होत असतानाही भाविक विठूरायाचं मुखदर्शन घेऊ शकणार आहेत. (Pandharpur News) इतिहासात पहिल्यांदाच असा एखादा निर्णय घेण्यात आल्यामुळं सध्या सर्वत स्तरांतून या निर्णयाचं स्वागत होत आहे.