लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : पोलीस प्रशासन आणि व्यावसायिकांकडून लावलेल्या सीसीटीव्हीमुळे पाचगणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ‘तिसऱ्या डोळ्या’च्या निगराणीखाली राहणार आहे. नवरात्र उत्सवात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असल्याने टवाळखोर आणि उत्सवांमध्ये विघ्न आणणाऱ्यांवर पोलिसांना नजर ठेवता येणार आहे.
कायदा व सुव्यवस्था भक्कम होण्यास मदत
सध्यपरिस्थिती चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, व्यावसायिकांनीही दुकानांसमोर सीसीटीव्ही लावले आहेत. सध्या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकारही सर्वत्र सुरू आहेत. अशा समाजकंटकांवरही पोलिसांची विशेष नजर असणार आहे. (Pachgani News) कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्वरित ताब्यात घेत, कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी सांगितले.
या वेळी बोलताना राजेश माने म्हणाले की, पोलीस प्रशासन व व्यावसायिकांच्या माध्यमातून सुरक्षित पर्यटननगरी पाचगणीसाठी ‘सीसीटीव्हीचे’चे जाळे अधिक मजबूत केले जाणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था भक्कम होण्यास मदत होईल.(Pachgani News) यापूर्वी शहरात लावलेल्या काही नादुरुस्त कॅमेऱ्यांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. मोक्याच्या ठिकाणी उच्च क्षमतेचे कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार असून, नागरिकांबरोबरच पर्यटकांची सुरक्षा हेच पाचगणी पोलिसांचे प्राधान्य असेल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत पाच जिल्ह्यांतील १,२५० स्पर्धकांची दमदार कामगिरी
Pachgani News : आंब्रळच्या उपसरपंचपदी भानुदास बिरामने बिनविरोध