लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी (सातारा) : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित स्पर्धेत पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेने सर्वोत्तम कामगिरी केली. यात राज्यातील ‘क’ वर्ग नगरपालिका गटात पाचगणी पालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत साडेतीन कोटींचे बक्षीस पटकावले आहे. (Panchgani Municipality is the first in the state under “Mazi Vasundhara” campaign; Won a prize of three and a half crores.)
१५ हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या विभागात पारितोषिक
१५ हजारपेक्ष्या कमी लोकसंख्या असलेल्या विभागात पाचगणी पालिकेला प्रथम क्रमांक, मिळविल्याने २ कोटी रुपयांचे तर (Pachgani News )भूमी थीमॅटिक मधील उच्चतम कामगिरी केलेल्या शहरात दीड कोटी असे साडेतीन कोटीचे बक्षीस मिळाले आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. (Pachgani News ) पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, आरोग्य विभाग प्रमुख सुरेश मडके, आरोग्य निरीक्षक गणेश कासुर्डे,पाणी पुरवठा अभियंता दिग्विजय गाढवे, शहर समन्वयक ओमकार ढोल यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत “माझी वसुंधरा” हे पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठीचे अभियान सुरू करण्यात आले आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका,नगरपरिषदा व ग्रामपंचायती यांनी या अभियानात सहभाग नोंदविला होता. पर्यावरण रक्षण व संवर्धन संदर्भात केलेल्या कामगिरीच्या आधारे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियान पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती.(Pachgani News ) या स्पर्धेत पाचगणी पालिकेने राज्यात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या अगोदर पाचगणी पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम क्रमांक पटकावला असून वाॅटर प्लसमध्ये थ्री स्टार मानांकनही मिळवले आहे.
दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर पाचगणी पालिकेत कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला होता. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, (Pachgani News ) पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : हॅप्पी ॲवर्स हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के