लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज, पाचगणी व पाचगणी परिसर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज दिवसभर पाचगणी बाजारपेठेतील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले. पाचगणी व आसपासच्या खेडेगावातील असंख्य नागरिकांनी भव्य रॅली काढून एक दिवसीय साखळी उपोषण केले.
भव्य रॅली काढून ‘रास्ता रोको’
पाचगणी व परिसरातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सकाळी साडेदहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. (Pachgani News) या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. आंबेडकर उद्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली जुना टेबल लॅंड नाका, धोबी गल्ली, गावठाण मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली.
या वेळी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय जात नाही’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’… आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. रॅलीत मुस्लिम बांधवांसह सर्व समाजातील नागरिकांची संख्या लक्षणीय होती. (Pachgani News) या वेळी सर्व कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावर ठाण मांडून सुमारे अर्धा तास ‘रास्ता रोको’ केला. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांच्यासह अनेक मान्यवरांची भाषणे झाली.
वंचित बहुजन आघाडी, भगवानराव वैराट युवक मंडळ, भीमनगर यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षण लढ्यासाठी जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले. नायब तहसीलदार दीपक सोनावणे, पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. (Pachgani News) रॅलीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पर्यटन नगरीत कडकडीत बंद पाळण्यात आल्याने पर्यटकांची गैरसोय झाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : महाबळेश्वर तालुका गट शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रगतीपथावर नेला – आमदार मकरंद पाटील
Pachgani News : भिलारे करियर अकॅडमीतून भविष्यातील अधिकारी निर्माण होतील : आमदार मकरंद पाटील
Pachgani News : पाचगणीतील आगळ्यावेगळ्या बस स्टाॅपमुळे पर्यटकांची गैरसोय दूर : राजेश माने