लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : महाराष्ट्रभरातील तब्ब्ल ५०७ ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांसोबत पुस्तकांचे गाव भिलार (ता. महाबळेश्वर) येथील हनुमान मंदिर सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रोजगार आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व शासनाच्या नियोजनाखाली महाराष्ट्र शासनातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भिलार येथील हनुमान मंदिर सभागृहात भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे, महाबळेश्वर तालुका प्रभारी अनिल भिलारे, मंगेश उपाध्याय, संतोष धनावडे, नितीन राजपुरे, मेहूल पुरोहित, भिलारचे ग्रामसेवक राजेंद्र चव्हाण, (Pachgani News) उपसरपंच सुनिता भिलारे, ग्रामपंचायत सदस्य वंदना भिलारे, मंगल भिलारे, वैशाली कांबळे, वंदना उत्तेकर, वैशाली भिलारे, पोपट शेठ भिलारे, सुनील जाधव,अण्णाभाऊ पाटील योजनेचे महाबळेश्वर तालुका प्रमुख निखिल चव्हाण, नोडल ऑफिसर प्रशांत बोंबले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाबळेश्वर या संस्थेचे प्राचार्य पराकुमार भोसले आणि सहकारी कर्मचारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
कौशल्य विकासाचा प्रयत्न महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल
भविष्यात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर कौशल्य विकासाची केंद्र होतील. विद्यार्थी, तरुण यांना रोजगाराच्या संधी या केंद्रातून उपलब्ध होतील, असे कौशल्य विकास मंत्री लोढाजी यांनी सांगितले. संपूर्ण भारताला स्वयंपूर्ण बनवायचे असेल तर गावोगावी कौशल्य विकासाची केंद्रे तयार व्हावीत, नोकरी आणि व्यवसायासाठी उत्तम स्किल असणे आवश्यक असून, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिंदे सरकारच्या नेतृत्वाखाली सुरु केलेला कौशल्य विकासाचा प्रयत्न महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल. असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. (Pachgani News) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : पाचगणीतील विद्यार्थ्यांनी अमृत कलशामध्ये पवित्र माती टाकत घेतली पंचप्राण शपथ
Pachgani News : पाचगणीतील शिवाजी चौकावर ‘तिसऱ्या डोळ्या’ची नजर; पोलिसांना मदत होणार