Pachgani News : पाचगणी : खिंगर (ता.महाबळेश्वर) येथील एका शेतकऱ्याच्या घरास पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विठ्ठल राऊ दुधाणे यांना जाग आल्याने जिवीतहानी झाली नाही. या घटनेत घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू जळून नष्ट झाल्या आहेत. (Panchgani : House gutted in fire caused by short circuit; The useful things of the world are destroyed by burning)
संपूर्ण घर भस्मसात
विठ्ठल दुधाणे यांना साडेचारच्या सुमारास धुरामुळे ठसका लागून जाग आली त्यावेळी त्यांना घरास आग लागल्याचे समझले. काही क्षणातच धुराचे आगीत रुपांतर झाले. (Pachgani News) आग लागल्याचे समजताच वेळीच घरातील लोक घराबाहेर धावत बाहेर पडले. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. वेळीच जनावरांची व शेळ्यांची सुटका केल्याने जनावरांचाही जीव वाचला.
आजूबाजूच्या नागरिकांनी मिळेल त्या भांड्यांमध्ये पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु वाऱ्यामुळे आगीने संपूर्ण घर भस्मसात झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. ग्रामस्थांनी पाचगणी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला संपर्क केल्याने (Pachgani News) अग्निशमनच्या मदतीने संपूर्ण आग विझवली. तो पर्यंत घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्य, पाण्याची मोटार,पाईप व ठिबक पाइपची बंडले,टी.व्ही.पलंग, गाद्या,घराचे दांड्या लाकूडसह जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
विठ्ठल दुधाणे या गरीब परिवाराच्या घराला आग लागून उभा संसार काही मिनिटांतच जळून राख झाला आहे. अंगावरच्या कपड्यांव्यतिरिक्त काहीही वाचले नाही. (Pachgani News) महसूल विभागाच्या वतीने आगीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून शासनाने या गरिब कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन !
Pachgani News : भोसे खिंडीेजवळ रस्त्यावरील वठलेल्या झाडाच्या फांद्यांचा होतोय प्रवाशांना त्रास
Pachgani News| खिंगर जिल्हापरिषद शाळेतील रेहाना अबिद भालदार यांचा निरोप समारंभ….