लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : आंब्रळ (ता. महाबळेश्वर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भानुदास बिरामने यांची बिनविरोध निवड झाली. अविश्वास ठरावामुळे ही जागा रिक्त झाली होती. निवडीबद्दल बिरामने यांचे अभिनंदन होत आहे.
आंब्रळचे उपसरपंच उमेश जाधव यांच्यावर ग्रामपंचायतीच्या सर्वच सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. यावर बैठक होवून, तो संमत करण्यात आला. (Pachgani News) त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आज दुपारी दोन वाजता सरपंच माधुरी गुलाब आंब्राळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाबळेश्वरच्या सहाय्यक निबंधक अनुराधा पंडितराव यांनी काम पाहिले.
उर्वरित विकासकामांचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार
नामनिर्देशन पत्र दाखल करताना भानुदास बिरामने यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिरामने यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. (Pachgani News) यानंतर उपसरपंच बिरामने यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर बोलताना बिरामने म्हणाले की, सरपंच आणि सर्व सदस्यांना बरोबर घेवून गावच्या उर्वरित विकासकामांचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार आहे.
या निवडीबद्दल बिरामने यांचे सरपंच माधुरी गुलाब आंब्राळे, सदस्य विकास जंगम, माधुरी जंगम, सरिता आंब्राळे, सारिका आंब्राळे, ग्रामसेवक वैभव काळे, ग्रामपंचायत कर्मचारी अविराज आंब्राळे तसेच ग्रामस्थ लक्ष्मण आंब्राळे, सुहास आंब्राळे, मारुती आंब्राळे, बाजीराव आंब्राळे, तुकाराम जाधव, प्रकाश आंब्राळे आदी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : क्रीडा स्पर्धांमुळे खिलाडू वृत्ती वृद्धिंगत होण्यास मदत- डॉ. समीर पवार
Pachgani News : पाचगणीतील टेबल लॅंडवरील अनधिकृत पत्र्याच्या स्टाॅलवर कारवाई