Pachgani News : पाचगणी : सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या माध्यमातून “एक राखी सीमेवरील भावांसाठी, सैनिक हो तुमच्यासाठी…” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात पांचगणी शहरातील शाळांमधील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.
रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या माध्यमातून राबविला उपक्रम
बंधुप्रेमाचे अनोखे नाते सांगणाऱ्या ‘रक्षाबंधन’ या पवित्र सणाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी तयार केलेली आकर्षक शुभेच्छापत्रे आणि राख्या सीमेवरील जवानांना पाठविण्यात आल्या. या वेळी पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी, सचिव नितीन कासूर्डे, माजी अध्यक्ष जयवंत भिलारे, सर्व रोटरीयन, इनरव्हील क्लबचे सदस्य, (Pachgani News) पांचगणी शहरातील बिलिमोरिया हायस्कूल, स्वीट में मरिज हायस्कूल, स्कॉलर्स फाउंडेशन, घाटजाई विद्या मंदिर शाळा क्रमांक २, हिलरेंज हायस्कूल, पॅमस होस्टेल, विद्यानिकेतन स्कूल आणि महाविद्यालय, विद्यानिकेतन हायस्कूल, हॅपी अवर्स स्कूल, पांचगणी इंटरनॅशनल स्कूल, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी म्हणाले की, सीमेवरील जवान हे रात्रंदिवस आपल्या सर्वांची रक्षा करत असतात.(Pachgani News) त्यांना रोटरी क्लबच्या माध्यमातून पांचगणीतील सर्व शाळांतील विद्यार्थिनींनी “एक राखी सीमेवरील भावांसाठी, सैनिक हो तुमच्यासाठी” या उपक्रमाच्या माध्यमातून राख्या पाठवल्या आहेत.
रोटरीचे माजी अध्यक्ष जयवंत भिलारे म्हणाले की, सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती प्रत्येकाला आदर अन् अभिमान वाटत असतो. (Pachgani News) हा आदर आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी राखी आणि शुभेच्छापत्रे हा एक उत्तम मार्ग आहे. राखी आणि शुभेच्छापत्रांमुळे सैनिकांचेही मनोबळ वाढवण्यास मदत होते.
सचिव नितीन कासूर्डे म्हणाले की, या उपक्रमातून आपल्या देशाच्या सिमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये निस्सीम राष्ट्रप्रेम जागृत होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : पाचगणी-वाई मार्गावरील अनधिकृत शेडचे पक्के बांधकाम हटवले