पुणे : आज चीनमधील एका छोट्या शहरात कोविड-19 चे एक प्रकरण आढळल्यानंतर लाखो लोकांचे लॉकडाऊन करण्यात आले. नवीन संसर्गामुळे, चीनच्या हेनान प्रांतातील पोलाद निर्मिती केंद्र, वुगांगने लॉकडाउनची घोषणा केली आहे.
गुरुवारी दुपारपर्यंत शहरातील 3,20,000 लोकांपैकी कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. यासोबतच स्थानिक अधिकारी घरपोच जीवनावश्यक वस्तू पोहोचवतील असेही सांगण्यात आले आहे. रहिवाशांना परवानगीशिवाय त्यांच्या कार वापरण्यास मनाई आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत काही लोकांदरम्यान प्रवासाला परवानगी दिली जाईल.
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी चीन आपल्या झिरो-कोविड धोरणापासून अजूनही मागे हटताना दिसत नाही. चीन मध्ये शून्य-कोविड धोरण अजूनही लागू आहे.
चीनमध्ये कोरोनाचे नवीन प्रकरण निदर्शनास येताच ताबडतोब लॉकडाऊन लागू केले जाते, लोकांना क्वारंटाईन करण्यास भाग पाडले जाते आणि हालचालींवर कडक निर्बंध लादले जातात. यामुळे एकीकडे चीनमधील लोक कोरोनामुळे कंटाळले आहेत तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेलाही फटका बसत आहे.