अजित जगताप
Old Pension | वडूज : सन २००५ सालापासून सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही स्वरूपाची सेवा निवृत्ती वेतन लाभ देता येत नाही. असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर दुसऱ्या बाजूला आमदारांना वाढीव सेवानिवृत्ती वेतन एका दिवसात मंजूर केले जाते. असा दुजाभाव करणाऱ्या राज्य सरकारने जुनी पेन्शन ( Old Pension )योजना लागू करावी. यासाठी वडूज ता. खटाव येथे वंचित बहुजन आघाडीने आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दिलेला आहे.
आज खटाव तालुका तहसील कार्यालयात महसूल ,आरोग्य, बांधकाम, पंचायत समिती, पशुवैद्यकीय, ग्रामीण रुग्णालय, पाणीपुरवठा,कृषी, लघु पाटबंधारे ,महिला व बाल कल्याण, शिक्षण विभाग, अशा विविध सरकारी-निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीने जुन्या पेन्शनसाठी आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनामध्ये समाजातील घटकांचाही सहभाग असणे अपेक्षित आहे. या अपेक्षितेची पहिली पूर्तता करण्यासाठी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली आहे.
आज वंचित बहुजन आघाडीचे खटाव तालुकाध्यक्ष सादिक मुल्ला यांच्यासह बी. आर . जगताप, विश्वास जगताप, जाफरभाई अत्तार, सुधाकर शीलवंत, दादा कांबळे, मनोहर नलवडे, उमेश भापकर, परवेज आत्तार, महेश वायदंडे, सुखदेव कांबळे, विशाल कांबळे आधी वंचित बहुजन आघाडीच्या शिलेदारांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना लेखी पाठिंबा दिला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय हो, तसेच कर्मचारी एकजुटीचा विजय असो, अशा जयघोष करण्यात आली. यावेळी आंदोलनात यशस्वी करण्यासाठी किरण अहिवळे, उमेश पाटील, तुकाराम खाडे,तुकाराम पाटील, रीना जावळे,शहनाझ शेख,मारुती पवार, सौ मनिषा नवनाथ जाधव,नवनाथ खरमाटे,नितीन काळे,माने, अमोल ढगे, आबासाहेब जाधव,सुजय कर्णे यांच्या सह शेकडो आंदोलनाला सहभागी झाले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Satara News : सातारच्या चंद्रविलास हॉटेलचे डिंकलाडू निघाले मदीनाला
Satara News : सातारा औद्योगिक न्यायालयाच्या मध्यस्थीने तूर्तास संप मागे : भगवानराव वैराट
Satara News : वडूज नगरीत बाल चिमुकल्यांच्या रंगपंचमीला सर्व धर्मीय मुलांचा आगळावेगळा सहभाग