Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दर्शनासाठी 3 हजार मोजा अन् 10 मिनिटांत दर्शन घ्या! त्र्यंबकेश्वरमधील संतापजनक प्रकाराचा नाशिक पोलिसांनी केला पर्दाफाश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 14 April 2026, 17:13

नाशिक: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर येथे भाविकांच्या श्रद्धेला धक्का देणारा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. दर्शनासाठी लांब रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना फसवून अवघ्या 10 मिनिटांत दर्शन घडवून आणण्याचे आमिष दाखवत प्रत्येकी 3000 रुपये उकळणाऱ्या टोळीचा नाशिक ग्रामीण पोलीस यांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात देवस्थान ट्रस्टचा विश्वस्त आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते पुरुषोत्तम कडलग तसेच गोटीराम पेहरे यांना अटक करण्यात आली आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या बदल्यात जलद दर्शन दिले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन राबवले. यामध्ये पोलीसच भाविक बनून मंदिर परिसरात गेले होते. एका दिवसात तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये प्रत्येकी 3000 रुपये घेऊन दर्शन दिले जात असल्याचे पुराव्यासह स्पष्ट झाले. कारवाईदरम्यान एका एजंटला ताब्यात घेतल्यानंतर या रॅकेटचे धागेदोरे थेट कडलग यांच्यापर्यंत पोहोचल्याचे समोर आले.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कडलग यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तपासाची व्याप्ती मोठी असल्याचे सांगत सरकारी वकिलांनी अधिक कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणाला राजकीय रंगही चढला आहे. भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी या घटनेवर टीका करत विरोधकांवर आरोप केले आहेत. तसेच माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विश्वस्त निवड प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित करत आर्थिक व्यवहारातून पदे मिळाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे केवळ दर्शन घोटाळाच नव्हे, तर देवस्थानच्या कारभारावर आणि विश्वस्त निवडीच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18

‘पहिले मी झोपणार’ पुण्यात रात्रपाळीवरून दोन सुरक्षारक्षकांमध्ये राडा; सहकाऱ्याचा गळा आवळला अन्…

Tuesday, 14 April 2026, 19:43

इंदापूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; भीम गौरव रॅलीने शहर दुमदुमले

Tuesday, 14 April 2026, 19:39

सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? ‘त्या’ निनावी पत्रावर रुपाली चाकणकरांनी दिलं सडेतोड उत्तर म्हणाल्या “हा बदनामीचा कुटील डाव”

Tuesday, 14 April 2026, 19:05
Next Post

एम.डी. ड्रग्ज विक्रेत्यांवर विमानतळ पोलिसांचा घाव; दोघे गजाआड, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.