Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Police Bribe News : पुणे पोलिसांची प्रतिमा मलिन! गुटखा कारवाई टाळण्यासाठी ४ लाखांची लाच; दोन पोलिसांवर कारवाई

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 6 May 2026, 18:00
Loni Kalbhor News: Serious negligence in duty! Loni Kalbhor's Village Revenue Officer Balasaheb Oneway suspended

Pune Police Bribe News पुणे, ता. ६ : गुटख्याच्या मालावर कारवाई न करण्यासाठी तब्बल ४ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला तडा गेला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. Pune Police Bribe News

आशिष आदिनाथ चव्हाण आणि इरफान इमजुद्दीन नदाफ अशी कारवाई करण्यात आलेल्या पोलिसांची नावे असून, ते दोघेही त्या वेळी खडक पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नोव्हेंबर २०२५ मध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. गुटख्याचा माल पकडल्यानंतर त्यावर कारवाई टाळण्यासाठी संबंधितांकडून ४ लाख रुपये उकळल्याचा आरोप त्यांच्यावर सिद्ध झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबर २०२५ रोजी या दोघांनी लोहियानगर येथून गुटख्याच्या मालाने भरलेली गाडीचा पाठलाग करत कोरेगाव पार्क परिसरात ती अडवली. त्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांना कॅम्प परिसरातील त्रिकोणी गार्डन येथे नेऊन त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या ४ लाख रुपये उकळण्यात आले.

 

विशेष म्हणजे, या प्रकरणात कारवाई होऊ नये म्हणून तक्रारदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचेही चौकशीत समोर आले आहे. गनिमी कावा संघटनेच्या माध्यमातून तक्रार मागे घेण्यासाठी तसेच आधी दिलेले जबाब बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. तक्रारदारांनी शपथपत्रावर पूर्वीचा जबाब फिरविल्याचेही चौकशीत उघड झाले आहे. फरासखाना विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांनी केलेल्या चौकशीत या दोन्ही पोलिसांनी कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्हीच्या कक्षेबाहेर राहून कारवाई केल्याचेही निदर्शनास आले आहे.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी आशिष चव्हाण व इरफान नदाफ यांना शिक्षा सुनावली आहे. त्यानुसार त्यांच्या पुढील दोन वर्षांच्या वार्षिक वेतनवाढीवर परिणाम न होईल अशा पद्धतीने ती रोखण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाईची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post

Leopard News : आंबेगावात बिबट्याचा थरार! भरधाव दुचाकीवर झेप; तरुण जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.