नाशिक: नाशिकमध्ये समोर आलेल्या कॉर्पोरेट अत्याचार प्रकरणाने (Nahik News) आणखी गंभीर वळण घेतले आहे. तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार (Nashik Crimes) केल्याचे तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप समोर आले आहेत. या प्रकरणात एकूण 9 पीडित (Nashik IT Company News) असल्याची माहिती आहे.

तपासादरम्यान काही महिलांना जबरदस्तीने हिजाब घालणे, नमाज पढणे आणि रोजा ठेवण्यास भाग पाडण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, पीडित तरुणींच्या वागणुकीत आणि जीवनशैलीत अचानक बदल झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
नाशिकमधील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तरुण-तरुणींच्या व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर करून काही जणांकडून धार्मिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. देवळाली परिसरातील एका उच्चशिक्षित तरुणीने 2022 मध्ये नोकरी स्वीकारल्यानंतर काही महिन्यांतच तिच्या वागणुकीत बदल दिसून आला.
तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने रमजानमध्ये रोजा ठेवण्यास सुरुवात केली, तसेच काही सवयींमध्येही बदल झाला. यामुळे पालकांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले जाते.
या प्रकरणातील आरोपींची कार्यपद्धती नियोजनबद्ध असल्याचा आरोप आहे. काही जणांकडून मैत्री करून मानसिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. काही प्रकरणांमध्ये जबरदस्तीचाही आरोप आहे.
या प्रकरणात शफी, तौसिफ अत्तार, शाहरूख कुरेशी आणि दानिश शेख यांची नावे समोर आली आहेत. तसेच निदा खान नावाची तरुणीही या प्रकरणात सहभागी असल्याची माहिती आहे. ती इतर तरुणींशी मैत्री करून त्यांना विशिष्ट पद्धतीने प्रभावित करत असल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (SIT) करत असून पुढील तपास सुरू आहे.







