Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘बायको आणि डॉक्टर मिळून माझी फसवणूक करत आहे’ बायकोच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन; वाचा धक्कादायक फेसबुक पोस्ट…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 10 April 2026, 19:13

बीड: बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नागापूर येथे एक (Beed News) धक्कादायक घटना समोर आली आहे. रामेश्वर गव्हाणे या तरुणाने पत्नी आणि तिच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून आपली व्यथा मांडली होती. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या शेतात विषारी औषध घेत गळफास घेत जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर एक मोठी पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी पत्नी नम्रता जाधव आणि तिच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत.

 

फेसबुक पोस्ट :

आई आणि सुरेखा मला माफ करा मी जे गेल्या दोन वर्षांपासून सहन करतो आहे. ते मनाला खूप वेदना देणारे आहे. त्यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. माझ्या बायकोच्या नम्रता जाधव हिच्या त्रासाला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती माझा प्रचंड मानसिक छळ करत आहे. सद्या ती म्हणत आहे की, मी गरोदर आहे. सात आठवड्याची गरोदर आहे. तिचे उपचार आई नर्सिंग होम अंबाजोगाई येथे सुरू आहेत. तेथील डॉ. सुनिता तोंडगे यांनी बाळाचे टोके सुरू झाले आहेत असे आजच म्हटले आहे. तसा रिपोर्ट दिला आहे. पण तो खोटा रिपोर्ट आणि फेक उपचार त्या करत आहेत. डॉक्टरांना मॅनेज करून माझी बायको माझी फसवणूक करत आहे. वर्षा मराठे गव्हाणे यांनी तिला या कामात मदत केली आहे. परळीच्या गुघे मॅडम यांचे आणि डॉ सुनिता तोंडगे आणि डॉ. गणेश तोंडगे यांच्याकडे सेटिंग लावून ती माझी फसवणूक करत आहे. कारण उद्या जर मी कोर्टात धाव घेतली तर म्हणता येत मुलं राहिलं होतं नंतर गर्भपात झाला. म्हणजे वंध्यत्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ती परत आली आहे‌. त्यामुळे आजच माझ्या बायकोची सोनोग्राफी करावी आणि आरोग्य विभागात सुरू असलेला गैरप्रकार थांबवावा ही नम्र विनंती. या प्रकरणातील खोटे रिपोर्ट देणार्या सर्व डॉक्टरांवर सखोल चौकशी करून कारवाई करावी.

यापूर्वी ही ती मला मारहाण करून उखळीला गेली होती. तिने मला मारहाण केली तरी मी तिला काहीही केलं नाही. तिला माझ्याकडून पैसे घेऊन जायचे आहेत. या आधीच तिची मावशी आणि काका यांनी सोन्याचे ओरीजनल दागिने घेऊन गेले आहेत आणि हुबेहूब सोन्यासारखे दागिने तयार करून माझ्या घरी आणून ठेवले आहेत. माझ्यावर सोन्याच्या चोरीचा आळ घालून किंवा इतर काही तरी कारणाने माझ्याकडून पैसे काढून घ्यायचे आहेत. रात्री मी झोपेत असताना मला घाबरवण्यासाठी अंगाला टच करते. चिमकुरे घेते, माझ्या जेवण मीठ, चटणी, मसाला जास्त टाकते अजून दुसरं काही तरी मिक्स करते‌ ज्यामुळे मला काहीच कळत नाही काय होतं आहे ते. गेल्या दोन वर्षांपासून माझा अपमान करणं, मला शिव्या देणं, मला उचकावणं, माझ्यासोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे करणं. स्वयंपाक जास्त करून ठेवणं. ज्यामुळे आईला नेहमी शिळीच भाकरी खावी लागल्यामुळे तिला पोटात दुखू लागले. सुरूवातीला सुरेखालाही खालीवरी पाहत होती मात्र तिने फरशी पुसायचे औषधं पिल्यापासून तिने तिला त्रास देणं कमी केलं. हा माझा छळ सुरू आहे.

सध्याच्या परिस्थितीत माझे नातेवाईक आहेत ते माझ्याकडून बोलत पण नाहीत कारण मी त्यांना जाब विचारला आहे. इतर कोणी मध्ये पडत नाही. त्याबरोबर त्यांनी फसवणूक केल्यामुळे त्यांना मला कसा त्रास होईल आणि मी कसा अडचणीत सापडेल किंवा मला जाळ्यात कसं पडायचं यासाठी ते प्रयत्नशील होते. यात त्यांनी माझे मित्र गळाला लावले. मोबाईल फोन हॅक करणे असे प्रकार केले असू शकतात. मला त्रास द्यायचा भडकवायचे आणि दुसरीकडून मी भडकलो की रेकॉर्डिग करून घ्यायचे असे अनेक प्रकार त्यांनी केले आहेत. कारण ते सराईत आहेत. त्यांना त्यांचं पितळ उघडे पडू द्यायचे नाही. त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ते माझ्या मागे घात धुवून लागले आहेत.

असं लग्न करून केली फसवणूक

दोन वर्षांपूर्वी लबाड लांडग्यांनी एकट्यात गाठून हरणाची शिकार केली‌. ज्ञानोबा जाधव, सुमित्रा जाधव, प्रल्हादराव शिंदे, शिवाजी शिंदे, पंढरी शिंदे, बबन शिंदे, सुभानराव शिंदे यांनी माझ्या इतर नातेवाईकांना मामा, गावातील लोकांना मध्ये न पडू देता किंवा मला म्हणाले की, मोठं लग्न करण्यात उगाच पैसे खर्च करण्याऐवजी छोटं लग्न करू असं म्हणून त्यांनी मला इतर नातेवाईकांना किंवा माझ्या गावातील लोकांना मध्ये सहभागी न करता माझं लग्न जमवलं. कारण यांना मुलीच्या मेडिकलविषयी सगळी माहिती म्हणजे या मुलीला मुल होत नाही याविषयी माहिती होती, ती माझ्यापासून लपवून माझी फसवणूक करून नम्रता जाधव आणि माझा विवाह लावला. या प्रकरणी वरील नावे घेतलेली मंडळी ही पडद्यासमोर होते तर पडद्याच्या मागे बालासाहेब सावंत हा माझ्या बायकोचा नातेवाईक आहे. आणि नवीन मराठे, वकील प्रकाश मराठे, वर्षा मराठे गव्हाणे हे होते. वरील तिघेही लग्न लावायला सुध्दा आली नव्हती. तर वर्षा मराठे गव्हाणे या लग्नाला होत्या. हे पडद्या मागचे कलाकार का म्हटलं आहे कारण त्यांचा माझ्यावर राग होता. माझ्या लग्नामुळे त्यांच्या जावायाला म्हणजे माझ्या भावाला त्यांच्या मनाप्रमाणे शेती वाटून द्यायची होती. मी त्यात मुख्य अडथळा होतो. त्यामुळे मला संपवण्यासाठी त्यांनी हे कटकारस्थान रचले. मी त्यांचं ऐकत नसल्याने मग त्यांनी मध्यस्थी करण्याची जबाबदारी मसला येथील प्रल्हाद शिंदे, आदींना दिली‌. नंतर लग्न झाल्यानंतर माझी बायको हे घर मला माझं वाटत नाही. मला इथं राहायचं नाही असं मला बोलत होती माझ्यासोबत वाद घालून तिचा बाप आणि भाऊ वारंवार घेऊन जात होते. थोड्या दिवसांनंतर कळलं की तिला मासिक पाळी येत नाही. तिला 2009 पासून हा प्रोब्लेम आहे. मुलं होण्यासाठी पाळी नियमित करून उपचार सुरू करू म्हटलं तरी माझ्या सोबत दवाखान्यात येत नव्हती‌. आली तरी म्हणायची इथले दवाखाने चांगले नाहीत. त्यामुळे मी दावाखान्यात येणार नाही. दवाखान्यात डॉक्टरांना काय बोलायची त्यानंतर डॉक्टरांची बोडीलॅग्वेज बदलून जायची. यासंदर्भात मी तिच्या वडिलांना विचारले असता ते काहीच बोलले नाहीत तर प्रल्हादराव शिंदे यांना या गोष्टीचा जाब विचारला असता त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरे दिली. जा तुला काय करायचं असेल तर कर असे म्हटले. मी म्हणालो, याचे काय करायचे तर त्यांनी पंढरी शिंदे, बबन शिंदे, ज्ञानोबा जाधव, आणि माझ्या बायकोचा काका माधव शिंदे माझ्या घरी आले आणि मला विचारू लागले काय करायचं म्हणून मी म्हणालो, हे सगळं प्रकरण तुम्ही केलं आहे. आणि तुमची मुलगी मला त्रास देत आहे. मला इथं राहायचं नाही म्हणून मी काय करावे जे काही करायचे असेल ते आता तुम्हीच करा. त्यांना कसं वाटतं होतं की मला खरं कळलं आहे. मी मुलीला नांदविण्यास नकार देईल मग ते पैसे मागून मुलीला घेऊन जातील. म्हणजे त्यांना माझ्याकडून पैसे काढून घ्यायचे होते. त्यांचा माझ्या पैशावर आणि संपत्तीवर डोळा ठेऊनच त्यांनी लग्न केले आहे. त्यांना सपोर्ट हा सिनियर वकील प्रकाश मराठे यांचा असल्याने ते कशातच मागेपुढे पाहत नव्हते. याच दरम्यान मुलगी मला प्रचंड मानसिक ताण देत होती. एक दोन वेळा तिने माझ्या अंगावर हात उचलला होता. मी जाऊद्या म्हणून हिच्या नादी लागून काही फायदा नाही.

मला न्याय मिळाला तर यापुढे माझ्यासारख्या एखाद्या निष्पाप मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही

मी माझी बायको आणि तिच्या घरचे यांना कंटाळून गेलो आहे त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण माझी बायको मला म्हणाली आहे. तुला मी कधीच नीट जगू देणार नाही. माझ्यामागे माझे आणि तुझे नातेवाईक आहेत‌. मी पैसे आणि शेती तर तुझ्याकडून घेऊनच जाणार आहे‌. शिवाय तुला पुढच्या आयुष्य खोट्या केसेस करून कोर्ट कचेरी आणि जेलची हवा खावी लागेल. त्यामुळे मी कंटाळून हे पाऊल उचलत आहे. तरी माझी विनंती आहे की, या लोकांना कायद्याने कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण त्यांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. पोलीस प्रशासन, सुज्ञ नागरिकांना मी विनंती करतो की, मला मेल्यानंतर तरी न्याय द्या. मला न्याय मिळाला तर यापुढे माझ्यासारख्या एखाद्या निष्पाप मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही आणि त्याला माझ्यासारखी आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये.

भैय्या आई आणि सुरेखाची काळजी घे. मला माहिती आहे मी आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाहीत पण मला होणाऱ्या असह्य वेदना मी सहन करून कंटाळून गेलो आहे.

केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणांनी,
काटे कुठेच नव्हते, केला दगा फुलांनी!!
मी बोललोच नव्हतो, माझ्या व्यथा कुठेही
सांगुन टाकल्या पण, माझ्याच आसवांनी !!
नेकीस आज माझ्या काहीच अर्थ नव्हता,
मी बेईमान ठरलो, लोकात बेईमानी!!
मी सत्य बोललो अन भलते घडुन गेले,
दुश्मन बनुन गेले माझेच दोस्त जानी!!
विश्वास वाटल्यावर, विश्वास ठेवला मी
त्यानीच कापला की, माझा गळा नखांनी !!
हे लाचखोर गेले देशा करुन स्वाहा,
गेले कुठे कळेना देशातले इमानी ?
गाफील राहीलो मी, त्या नेमक्या क्षणाला,
मागून वार केले, माझ्याच माणसानी!!
दोस्तासमान माझे सुख बेईमान झाले,
अद्याप दु:ख आहे, शत्रूपरी इमानी!!
विसरुन जावयाचा अधिकार तुज असावा,
त्याच्या मुळेच सहजी, ही संपली कहाणी !!

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46
Next Post
politics

politics : ‘फोडाफोडी आमचा स्वभाव नाही!’ चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली महायुतीची भूमिका; अफवांना पूर्णविराम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.