Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोल्हापूर ‘गोकुळ’ निवडणुकीचा बिगुल वाजला; ५,३३१ मतदार बजावणार अधिकार, १८ ऑक्टोबरला मतदान

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 9 September 2026, 18:58

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. गोकुळच्या २५ संचालक पदांसाठी ही निवडणूक होणार असून, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होईल. १९ ऑक्टोबरला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदाच्या निवडणुकीत ५ हजार ३३१ प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिनिधी मतदान करणार आहेत.

निवडणूक प्रक्रियेला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. १५ ते २२ सप्टेंबरदरम्यान उमेदवारी अर्जांची विक्री आणि स्वीकृती केली जाईल. २३ सप्टेंबरला अर्जांची छाननी होईल, तर २४ सप्टेंबरला वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २५ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरपर्यंत मुदत असेल. ८ ऑक्टोबरला अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.

गोकुळच्या निवडणुकीमुळे कोल्हापूरमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील विरोधकांना एकत्र आणत महादेवराव महाडिक यांच्या गटाची दीर्घकाळाची सत्ता संपुष्टात आणली होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले असून त्याचा परिणाम गोकुळच्या राजकारणावरही झाला आहे.

मागील निवडणुकीत सतेज पाटील यांच्यासोबत असलेले मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आबिटकर आता महायुतीसोबत आहेत. भाजपचे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह महायुतीतील नेत्यांनी गोकुळसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. धनंजय महाडिक यांनी गोकुळच्या सर्व २५ जागांवर विजय मिळवण्याचा ‘२५-०’चा दावा केला आहे.

 

दुसरीकडे, सतेज पाटील यांनीही गोकुळवरील आपली पकड कायम ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी वाढवत राजकीय समीकरणे आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक सतेज पाटील गट विरुद्ध महायुती अशी रंगण्याची शक्यता असून, गोकुळची सत्ता कोणाच्या ताब्यात जाणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

Friday, 2 October 2026, 9:28

कोकणातलं पुराचं पाणी दुष्काळी भागात पोहोचणार? महाराष्ट्रात ‘वॉटर लिंक टनेल’ची चर्चा; नेमकं काय होणार? जाणून घ्या

Friday, 2 October 2026, 8:51

8.57 लाख कोटींची गुंतवणूक अन् 2.91 लाख रोजगार! महाराष्ट्रासाठी इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये मोठी घोषणा

Friday, 2 October 2026, 8:27

देवीची मूर्ती आणली अन् परतीच्या वाटेत अनर्थ! समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू

Friday, 2 October 2026, 8:18

मतदाराचं नाव ‘बॉम्बस्फोट’, वडिलांचं नाव ‘बॉम्ब’! पुणे शिक्षक मतदार यादीत अजब नोंद

Friday, 2 October 2026, 8:09
Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अष्टापूरला मानाचा 'अध्यक्ष चषक'! पुणे जिल्ह्यात पटकवला तृतीय क्रमांक; शैक्षणिक गुणवत्ता अन् लोकसहभागातून शाळेने रचला इतिहास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp