जामखेड, (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शहरातील बराटे वस्ती येथील १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज मंगळवारी २५ जुन रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रहात्या घरात घडली.
शिवम ज्ञानेश्वर बोराटे (वय-१५, रा. बराटे वस्ती, ता. जामखेड, जि. अ. नगर ) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकले नसुन जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोराटे कुटुंब हे शहरातील बराटे वस्ती येथे राहण्यास असून त्यांचे किराणा दुकान आहे. शिवम हा इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होता. आज सकाळी तो आपल्या किराणा दुकानात बसला होता. यानंतर शाळेची वेळ झाल्याने त्याची आई घरातुन दुकानात आली आणि शिवमला शाळेत जाण्याची तयारी कर असं म्हणुन घरी जाण्यास सांगितले.
दरम्यान, शिवम दुकानातून दुसऱ्या मजल्यावरील आपल्या घरात जाऊन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवमने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजु शकले नसून याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.