नाशिक: नाशिकचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बडगुजर यांनी जामीनसाठी केलेल्या अर्जावर बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालायाने आपला राखून ठेवला आहे. जामीन अर्जावर 20 जानेवारीला सुनावणी होणार असल्याचं न्यायालयाने सांगितले.
एसीबीने बडगुजर यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात कोट्यावधी रुपयांचे मनी लाँड्रिंग झाले असल्याचं दिसत आहे, असं सरकारी वकिलांनी सांगितले. बुधवारी सरकारी वकिलाची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने बचाव पक्षाकडून मागण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने बचाव पक्षाला वेळ दिला आहे.