नाशिक, (मनमाड) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मविश्वास गमावला आहे. त्यामुळे ते धर्म जात याविषयावर बोलत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होतील अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार आज दिंडोरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ नाशिक येथील मनमाड येथील सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी अनेक राजकीय मुद्यावर भाष्य केले.
शरद पवार म्हणाले, हा देश लोकशाहीला मानणारा असून मोदींची भूमिका बोलायची एक अन् करायची एक अशी आहे. मोदी यांची सत्ता आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबल्या. समाजातील लहान घटकांना आणखी लहान करण्याच्या प्रयत्न या मोदी सरकारने केला आहे, असं शरद पवार म्हणाले.
कांद्यावर बंदी, साखरेवर बंदी सगळ्याच गोष्टीवर बंदी : शरद पवार
शरद पवार कृषी खात्याचे मंत्री होते, तेव्हा त्यांनी काय केले, असा सवाल विरोधक करत आहेत, याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यात सातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कांद्यावर बंदी, साखरेवर बंदी सगळ्याच गोष्टीवर बंदी…नेमके काय चालले आहे. कष्टाने पिकवलेले बाजारपेठात गेले, तर शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडतील.
त्याचा संसार फुलेल. मोदी म्हणतात गरीबांना फुकट धान्य देता., कांदा निर्यातबंदीचा प्रश्न महत्वाचा होता, पण केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवली नाही. मोदींचे सरकार हे फसवे सरकार आहे. यांच्यवर विश्वास ठेवता येणार नाही, असा हल्लबोल शरद पवार यांनी मोदीवर केला आहे.
2014 मध्ये देश अन्नधान्य स्वयंपूर्ण होता : शरद पवार
पुढे बोलताना म्हणाले, नरेंद्र मोदी म्हणतात शरद पवार यांनी कृषी मंत्री असतांना देशात काय केले? मी 2004 मध्ये कृषी मंत्री झालो, तेव्हा अन्नधान्य आयात करावे लागेल अशी स्थिती होती. 2014 मध्ये देश अन्नधान्य स्वयंपूर्ण होता. मी कांद्याची निर्यात बंदी उठवली, शेतकरी कर्जमाफी केली आणि सत्तेत असलेली लोक विचारतात शरद पवार यांनी काय केले, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
शरद पवारांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
नरेंद्र मोदी म्हणतात मी 80 टक्के नागरिकांना मोफत धान्य दिले. मात्र, हे अन्नधान्य पिकवत कोण? याचे श्रेय शेतकऱ्यांचे आहे, याचे श्रेय जुन्या सरकारचे आहे आणि आम्हाला विचारात काय केले ? असे म्हणत शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर पलटवार केला.
शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळाले, तर तुमचं काय बिघडलं : शरद पवार
धुळे येथील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या शरद पवार म्हणाले, मी केंद्रात कृषी मंत्री असताना कांद्याचे भाव वाढले म्हणून भाजपच्या खासदारांनी लोकसभेत भाव कमी करण्याची मागणी करत आंदोलन होते. कांदा उत्पादक शेतकऱ्याला एखाद्या वर्षी दोन पैसे जास्त मिळाले तर तुमचं काय बिघडलं? असा प्रतिप्रश्न करीत मी त्यांची बोलती बंद केली, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.