शिर्डी : भाजपच्या हातात सत्ता आहे. शिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती असं काम भाजपच्यावतीने सुरू आहे
भाजप लोकसभा निवडणूकीत400 पेक्षा जास्त जागा जिंकेल असं सांगितलं जात. आता त्यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. भारताच्या दक्षिणेत आणि इतर राज्यात भाजप नाही. तरी 450 जागा जिंकणार हे कोणत्या आधारावर भाजप सांगत आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर सुरू आहे. या शिबिरात शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. देशातील चित्रं वेगळं आहे. भाजपच्या हातात सत्ता आहे. त्याशिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती असं काम भाजपच्यावतीने सुरू असल्याचे पवार म्हणाले.
अनेक मद्द्यांवरून फसवणूक
काही राज्य अशी आहेत जिथं भाजप आहे. मात्र, ते स्वत: च्या बळावर नाही. गोव्यात काँग्रेसच सरकार होत तिथं आमदार फोडण्यात आले आणि भाजपने सत्ता स्थापन केली. देशात भाजपला अनुकूल वातावरण नाही असेही पवार यांनी म्हटले. आपल्या हातात सत्ता आल्यानंतर अनेक घोषणा केल्या. मात्र, त्या पूर्ण केल्या नाहीत केवळ फसवणूक केली,आता हे लोकांच्या लक्षात येऊ लागलं आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सांगितले. मात्र, तसं झालं नाही. शहरी भागातील लोकांना घरे देऊ परंतु ते देखील झालं नाही, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.