Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आजपासून आपण दोस्त’ म्हणत शेकहॅण्ड करायला जवळ आला अन् कमरेला लावलेलं पिस्तूल काढत पोटावर दोन राउंड फायर; १४ जणांवर गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 18 August 2026, 16:30

नाशिक : नाशिकमधील गोसावीवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सुमित अरुण पगारे असे मृत तरुणाचे नाव असून, रविवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अवघ्या 24 तासांत 12 संशयितांना अटक केली आहे. मुख्य गोळीबार करणाऱ्या संशयितासह आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.

पानमसाला घेत असताना झाला हल्ला

या प्रकरणी सुमित भाटिया यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास सुमित पगारे, सुमित भाटिया आणि आकाश बोर्डे हे तिघे गोसावीवाडीतील टिळे हॉस्पिटलसमोरील गंगोत्री जनता स्टोअर येथे पानमसाला खरेदी करण्यासाठी गेले होते.

याच वेळी 14 जणांचा एक गट तेथे आला. त्यांनी जुन्या वादाचा मुद्दा उपस्थित करत तिघांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, काही क्षणांतच या वादाचे रूप हिंसक हल्ल्यात बदलले.

हस्तांदोलनाच्या बहाण्याने झाडल्या गोळ्या

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, राजिक शेख याने सुमित पगारेला ‘आपल्यातील वाद कायमचा मिटवू’ असे सांगत हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा केवळ बहाणा असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

 

हात मिळवत असताना राजिक शेख याने कमरेला लावलेले पिस्तूल बाहेर काढले आणि सुमित पगारेच्या पोटावर सलग दोन गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी झालेल्या सुमित पगारेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून हत्या

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे आणि नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले.

हत्येनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गोसावीवाडी परिसरात दिवसभर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्राथमिक तपासात पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

12 संशयितांना अटक, दोघांचा शोध सुरू

या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात 14 संशयितांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत 12 संशयितांना अटक केली आहे. मुख्य गोळीबार करणारा संशयित आणि आणखी एका आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

Friday, 2 October 2026, 9:28

कोकणातलं पुराचं पाणी दुष्काळी भागात पोहोचणार? महाराष्ट्रात ‘वॉटर लिंक टनेल’ची चर्चा; नेमकं काय होणार? जाणून घ्या

Friday, 2 October 2026, 8:51

8.57 लाख कोटींची गुंतवणूक अन् 2.91 लाख रोजगार! महाराष्ट्रासाठी इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये मोठी घोषणा

Friday, 2 October 2026, 8:27

देवीची मूर्ती आणली अन् परतीच्या वाटेत अनर्थ! समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू

Friday, 2 October 2026, 8:18

मतदाराचं नाव ‘बॉम्बस्फोट’, वडिलांचं नाव ‘बॉम्ब’! पुणे शिक्षक मतदार यादीत अजब नोंद

Friday, 2 October 2026, 8:09
Next Post

लग्नानंतर सगळं सुरळीत होत पण पतीच्या ‘त्या’ भयंकर मागणीने संसाराचा शेवट? छ. संभाजीनगर हादरलं!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp