नाशिक: नाशिकमधून (Nashik Crime News) धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या जन्मदात्या आईचा चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना सातपूर परिसरात घडली. मंगला घोलप (वय 45) असं मृत महिलेचं नाव आहे. तर स्वप्नील घोलप असं हत्या करण्याऱ्या त्यांच्या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मयत मंगला घोलप या सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होत्या. त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांच्याच मुलगा स्वप्नील घोलप याने धारदार शस्त्राने खून केला. या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेहाचा पंचनामा करत आरोपीला ताब्यात घेतलं.
जन्मदात्या आईच्या हत्ये मागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, पोलीस सखोल तपास करत आहेत. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







