पुणे (Pune Crime News_: हडपसर परिसरात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरवर (Gang attacks software engineer) “तू आमच्या टार्गेटवर आहेस” अशी धमकी देत पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला. डोक्यात लाकडी दांडुका मारून गंभीर जखमी केल्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) तिघांना अटक केली आहे.

मनोज रंजनकुमार सिंग (वय 42, रा. मातृछाया बिल्डिंग, झेड कॉर्नर, मांजरी) असं मारहाण झालेल्या इंजिनिअरचं नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बाबू ऊर्फ विकी निवास कांबळे, सनी प्रकाश कांबळे आणि गोकुळ शिवाजी सानप (सर्व रा. झेड कॉर्नर, मांजरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रेमकुमार आणि सार्थक उत्तेकर यांच्यावर गुन्हा दाखल असून ते फरार आहेत.
काय घडलं होतं नेमकं?
शनिवारी रात्री साडेदहा वाजता मनोज सिंग हे त्यांच्या घरासमोर मित्र चेतन खैरनारसोबत बोलत थांबले होते. त्यावेळी एक कार वेगात त्यांच्या समोरून जाऊन थोड्याच अंतरावर थांबली. कारमधून उतरणाऱ्या तिघांपैकी ओळखीचा असलेला सार्थक उत्तेकर पुढे येऊन म्हणाला “तू आमच्या टार्गेटवर आहेस, तुला पाहून घेतो” अशी धमकी देऊन ते निघून गेले.
हेही वाचा: संतापजन..! 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा दिवसाढवळ्या विनयभंग; नको ‘त्या’ ठिकाणी हात लावला अन्…
थोड्यावेळाने मनोज सिंग यांनी आपले मित्र रमेश भिसे, संतोष सारवान आणि भाऊ अजितकुमार सिंग यांना बोलावले. काही वेळातच पुन्हा एक कार घटनास्थळी आली आणि त्यातून 4,5 जण उतरले. यावेळी बाबू कांबळे याने लाकडी दांडक्याने मनोज सिंग यांच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केलं. त्यानंतर सनी कांबळे, प्रेमकुमार, सार्थक उत्तेकर आणि गोकुळ सानप यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तीन आरोपींना अटक
या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा: पोटच्या मुलाचं जन्मदात्या आईसोबत राक्षसी कृत्य..! निवृत्त महिला अधिकाऱ्यासोबत काय घडलं? शहरात खळबळ






