पेठ : शहरातील रस्त्यावर गाळ व पाऊस पडल्याने घसरण होत असल्याने दुचाकीस्वारांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट नगरपंचायत कार्यालयावर मुख्याधिकारी यांच्या दालनावर चिखलफेक केल्याची प्रकार घडला आहे.
पेठ शहरातील प्राचीन तलावाचे खोलीकरण व गाळ काढण्याचे काम सुरू असून, गाळ वाहतूक करणाऱ्या वाहनांतून काही गळती होऊन रस्त्यावर गाळ पडून पावसामुळे रस्त्यावर घसरण होत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, वाहनचालकांना कसरत करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये नगरपंचायत प्रशासनासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे नगराध्यक्ष करण करवंदे यांनी तत्काळ या घटनेची दखल घेत रस्त्यावरील चिखल साफ करीत पाणी मारून रस्ता साफ करीत नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त केली.