जळगाव : जळगावातून एक धक्कादायकी बातमी समोर येत आहे. सद्या सांबर चोरट्यांचा सुळसुळाट बघायला मिळत आहे, असाच एक प्रकार जळगावमध्ये उघडकीस आला आहे. सेवानिवृत्त झालेल्या एका व्यक्तीला फोन करून क्रेडिट कार्ड विषयी माहिती जाणून घेतली. परंतु, खाजगी बँकेच्या क्रेडिट कार्डवर ऑफर असल्याचे सांगितले. यावर विश्वास ठेवून क्रेडिट कार्डासाठी होकार दिला गेला. यानंतर संबंधिताने सांगितल्यानुसार मोबाईल ॲप डाऊनलोड करताच बँक खात्यातून २ लाख ७८ हजार रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या या कर्मचाऱ्याला १५ ऑगस्टला एका अनोळखी व्यक्तीने फोनवर संपर्क केला. समोरच्याने कोणते क्रेडीट कार्ड वापरता, अशी विचारणा केली असता या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर एका खासगी बँकेच्या क्रेडीट कार्डची माहिती देत त्यावर चांगली ऑफर असल्याचे सांगितले गेले. त्यावर विश्वास ठेवत कार्ड घेण्याबाबत होकार दिला गेला.
ॲप डाऊनलोड करताच रक्कम गायब..
ॲप डाऊनलोड करताच रक्कम काढली समोरच्या व्यक्तीने सेवानिवृत्तास लिंक पाठविण्यासह एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ॲप डाऊनलोड केल्यानंतर ओटीपी व इतर कोणतीही माहिती दिली नाही, मात्र ॲपमुळे मोबाईलमधील सर्व माहिती दिसू लागल्याने याचा फायदा घेत संबंधिताने बँक खात्यातून दोन लाख ७८ हजार ८८५ रुपये काढून घेतले. हा प्रकार घडल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचारी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपस पोलीस करत आहेत.