नाशिक: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या अघोरी साम्राज्याचे एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत असून, आता हे प्रकरण थेट राज्याच्या राजकारणापर्यंत पोहोचले आहे. एसआयटीच्या (SIT) तपासात समोर आलेल्या माहितीने नाशिकच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

तपासादरम्यान खरातचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्यात 2 हजारांहून अधिक संशयास्पद नंबर आढळले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व नंबर कोणत्याही नावाशिवाय सेव्ह केलेले आहेत. हे नंबर कोणाचे आहेत? खरात यांचा वापर नेमका कशासाठी करत होता? हे शोधण्यासाठी पोलिसांनी मोबाईलची ‘क्लोन कॉपी’ तयार केली असून सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
सोमवारी 30 मार्च रोजी, विशेष तपास पथकाने खरातच्या कार्यालयात तपासणी केली. एका पीडित महिलेला सोबत घेऊन पोलिसांनी ‘सीन रिक्रिएशन’ केले. खरात पीडितेवर ताबा मिळवण्यासाठी कोणते मंत्र म्हणायचा, तिला संमोहित करण्यासाठी कोणते पदार्थ खायला-प्यायला द्यायचा, पोलिसांना डायरीही जप्त केली असून विशेष म्हणजे, तिथे काळे पडलेले पेढे, काळ्या रंगाची फळे, रत्न, औषध सापडली असून याचा सविस्तर अभ्यास पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.







