Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वरवंड येथील “हॉटेल सिद्धेश्वर प्युअर व्हेज” मधून वीजचोरी; दोघांवर गुन्हा दाखल 

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 19 June 2026, 18:09

यवत, ता. १९ : दौंड तालुक्यातील वरवंड येथील एका हॉटेलमध्ये थेट पोलवरील वीजवाहिनीतून अनधिकृत जोडणी करून वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी वीज ग्राहक आणि सध्याच्या वीज वापरदाराविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीच्या बारामती येथील भरारी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता रघुनाथ नाथ्याबा गोफणे (वय ५४) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरवंड येथील वीज ग्राहक अहिरेश्वर जगन्नाथ जगताप आणि हॉटेलचे सध्याचे वीज वापरदार सिद्धेश्वर नारायण सरगर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

महावितरणच्या भरारी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार ४ फेब्रुवारी २०२६ रोजी “हॉटेल सिद्धेश्वर प्युअर व्हेज” येथे तपासणी करण्यात आली. यावेळी पोलवरून येणाऱ्या इनकमिंग सर्व्हिस वायरला अनधिकृत ‘टॅप’ करून ‘चेंज ओव्हर स्विच’च्या माध्यमातून थेट वीजपुरवठा घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वीजमीटरवर वीज वापराची योग्य नोंद होत नसल्याची बाब स्पष्ट झाली.

तपासणीदरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, वीजचोरीसाठी वापरण्यात आलेली वायर जप्त करण्यात आली. तसेच वीजमीटर आणि घटनास्थळाचे छायाचित्रणही करण्यात आले. संबंधित व्यावसायिक ठिकाणाचा एकूण वीजभार ४.९७ किलोवॅट आढळून आला, तर मंजूर भार केवळ २ किलोवॅट असल्याचे तपासात समोर आले.

 

महावितरणच्या अहवालानुसार ग्राहकाकडून २०७ युनिट वीज वापराची नोंद लपविण्यात आली होती. यासाठी १६ हजार ९८० रुपयांची वीजचोरीची रक्कम ग्राहकाने मार्च महिन्यात भरली असली, तरी २५ हजार रुपयांची तडजोड रक्कम अद्याप भरलेली नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत…

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

'तुझी बायको मला, माझी तुला!' फेसबूकवरून चालते पार्टनर स्वॅपिंगचे गलिच्छ रॅकेट; एका रात्रीचे मिळतात 20 हजार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp